भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (harbhajan singh) याने मागच्या काही दिवसांपूर्वी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली. हरभजनने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत १०३ कसोटी, २३६ एकदिवसीय, २८ टी२० आंतरराष्ट्रीय आणि १६३ आयपीएल सामने खेळले आहेत. परंतु तरीदेखील तो या कारकिर्दीवर समाधानी नाही आणि त्याने ही गोष्टी निवृत्ती घेताना देखील बोलून दाखवली आहे. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आता हरभजनची इच्छा आहे की, त्याच्या आयुष्यावर आधारित एखादा चित्रपट (biopic) किंवा वेब सीरीज बनावी.
हरभजनची इच्छा आहे की, त्याच्या आतापर्यंतचा प्रवास चाहत्यांना कळावा, तसेच तो जेव्हा खेळायचा तेव्हा तो कशाप्रकारचा व्यक्ती होता, हे देखील कळावे. भारतीय संघातील एखाद्या खेळाडूव चित्रपट बनणे हे काही नवीन नाही. यापूर्वी एमएस धोनी, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अजहरुद्दीन या दिग्गजांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अलिकडेच कपिल देव यांच्या नेतृत्वात १९८३ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर आधारित ‘८३’ चित्रपट देखील प्रदर्शित झाला आणि चाहत्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.
हरभजनने एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, “मला माझ्या जीवनावर बनलेला एक चित्रपट किंवा वेब सीरीज हवी आहे, ज्यामुळे लोकांना माझी कथा आणि माझे मत समजू शकेल की, मी कशा प्रकारचा माणूस आहे आणि काय करतो.” हरभजनला पुढे प्रश्न विचारला गेला की, त्याला स्वतःच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्याला त्याची भूमिका साकारताना पाहायला आवडेल. यावर तो म्हणाला, “हे सांगू शकत नाही की, माझ्या बायोपिकमध्ये कोण नायक असेल. यासाठी एक नाही, तर अनेक आहेत.”
दरम्यान, हरभजन निवृत्ती घेण्यापूर्वी अनेक वर्ष भारतीय संघाच्या बाहेर होता. अशात संघासोबत खेळताना निवृत्ती घेण्याची संधी त्याला मिळाली नाही. याबाबत तो म्हणाला की, “प्रत्येक खेळाडूला भारतीय संघाची जर्सी घालून निवृत्ती घेण्याची इच्छा असते, पण नशीब नेहमीच साथ देत नाही आणि अनेकदा तुमची जी इच्छा असते, ते होऊ शकत नाही.” यावेळी त्याने वीवीएस लक्ष्मण, राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांचे उदाहरण देत सांगितले की, त्यांना देखील संघातून बाहेर केले गेले होते आणि नंतर त्यांनी निवृत्ती घेतली होती.
महत्वाच्या बातम्या –
“अनेकांना वाटले मी संपलो, पण मी…”; ‘त्या’ दिवसांची आठवण काढत अश्विन झाला भावूक
माजी क्रिकेटपटू म्हणतोय, “निवडसमितीने विराट-रोहित वादाच्या आगीत तेल ओतले”
शास्त्री ‘लगे रहो’ म्हणाले आणि गाबामध्ये गिल-पंतने इतिहास रचला; वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा –