---Advertisement---

“अनेकांना वाटले मी संपलो, पण मी…”; ‘त्या’ दिवसांची आठवण काढत अश्विन झाला भावूक

r-ashwin
---Advertisement---

भारतीय संघाचा (team india) दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin) साठी २०२१ चांगले ठरले. मागच्या वर्षी अश्विनने भारताच्या मर्यादित षटकांच्या संघांमध्ये चांगल्या प्रकारे पुनरागमन केले. त्यापूर्वी, मागच्या जवळपास चार वर्षांपासून तो मर्यादित षटकांच्या संघातून बाहेर होता. यादरम्यान त्याची कसोटी गोलंदाज म्हणून देखील ओळख निर्माण होऊ लागली होती. आता, अश्विनने मर्यादित षटकांच्या संघातून बाहेर असताना चार वर्ष त्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, याचा खुलासा केला आहे.

अश्विनने मोठ्या काळानंतर मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या आयसीसी टी२० विश्वचषकातून भारताच्या टी२० संघात पुनरागमन केले होते. तसेच २०२१ च्या शेवटी त्याला तीन कसोटी सामने खेळण्याची देखील संधी मिळाली होती. अश्विन सध्या भारताच्या तिन्ही प्रकारांच्या संघात खेळत असला, तरी संघातील हे पुनरागमन त्याच्यासाठी सोपे नव्हते. चार वर्ष त्याने संघात स्थान बनवण्यासाठी प्रयत्न केला. दरम्यानच्या काळाविषयी बोलताना तो म्हणाला की, लोकांना वाटू लागले होते की, त्याची कारकीर्द संपली, पण त्याने पुनरागमन केले.

बॅकस्टेज विथ बोरिया, या कार्यक्रमात बोलताना अश्विन म्हणाला की, “एका खेळाडूच्या रूपात तुम्ही अनेकदा टीकांचा सामना करत राहता. तुम्हाला त्यातून बाहेर यावे लागते. अनेकांनी मी संपल्याचे सांगितले. मी जेव्हा चेन्नईत क्लबचे सामने खेळायला जायचो, तेव्हा त्या सामन्यांमध्येही खूप मेहनत करायचो. पण या काळात मी मी अनेक लोकांना कुजबुजताना ऐकले की, हा माणूस याठिकाणी येऊन क्लब क्रिकेट खेळत आहे, कारण त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली आहे. मी सतत अशाप्रकारच्या चर्चा ऐकायचो. अनेकदा या चर्चा हसून टाळणे सोपे असायचे. मात्र, अनेकदा वाईट वाटायचे.”

अश्विनने मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीची आठवण काढत सांगितले की, माझी तब्येत खराब होती. मात्र, तरीही मी गोलंदाजी करत होतो. तो म्हणाला की, “सिडनी कसोटीच्या आधी गोलंदाजी करत होतो. तेव्हा मला वाटले की, जर मला १०० षटके टाकाचे असतील, तर मी कसोटी सामना खेळू शकणार नाही. मला प्रश्न विचारला गेला की, तू पहिल्या डावात ५० आणि दुसऱ्या डावात ५० षटके टाकू शकतो का ? मी म्हणालो मी वेदनेला लांब ठेवून गोलंदाजी करू शकतो. कारण, मी क्रिकेटच्या मैदानावर मरूही शकतो, परंतु स्पर्धेतून बाहेर जाऊ शकत नाही.”

महत्वाच्या बातम्या –

‘भारतीय संघ भित्रेपणाने खेळला, असे वाटले’, टी२० विश्वचषकातील कामगिरीबाबत रवी शास्त्रींचे मोठे भाष्य

रोहित-विराट वादाविषयी निवडसमिती म्हणातायेत, “ते दोघे…”

भान हरपून नाचायचंय, तर रणवीर सिंग अन् रवी शास्त्रींचा ‘हा’ व्हिडिओ पाहाच, सर्वांचेच वेधलंय लक्ष

व्हिडिओ पाहा –

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---