---Advertisement---

भान हरपून नाचायचंय, तर रणवीर सिंग अन् रवी शास्त्रींचा ‘हा’ व्हिडिओ पाहाच, सर्वांचेच वेधलंय लक्ष

On: शनिवार, जानेवारी 1, 2022 2:10 PM
Ravi-Shastri
---Advertisement---

जगभरात नवीन वर्षाचे (New Year) स्वागत धूमधडाक्यात केले जात आहे. प्रत्येकजण आपापल्या अंदाजात २०२२ वर्षाची सुरुवात करत आहेत. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही नवीन वर्षाच्या शुभेच्छा सोशल मीडियावर दिल्या आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री  (Ravi Shastri) यांच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. 

रवी शास्त्रींनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगबरोबर नाचतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना शास्त्री यांनी रणवीरचे डान्सच्या टीप्स देण्याबद्दल आभारही मानले आहेत.

त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘२०२२ वर्षात अशाचप्रकारे (धूमधडाक्यात) पदार्पण करत आहे. रणवीर सिंग तूझे डान्सच्या टीप्ससाठी धन्यवाद. २०२२ वर्ष तुम्हाला सुखाचे, निरोगी आणि प्रेरणादायी जावे.’

https://twitter.com/RaviShastriOfc/status/1477107486293434372

रवी शास्त्री यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो व्हिडिओ ‘८३’ चित्रपटाच्या प्रीमीयर नाईटचा आहे. त्या रात्री शास्त्री आणि रणवीर सिंगने जबरदस्त डान्स केला होता. ‘८३’ हा चित्रपट विश्वचषक १९८३ सालच्या विजेत्या भारतीय संघाच्या प्रवासावर आधारीत आहे. या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात रवी शास्त्री यांचाही समावेश होता. या विश्वचषकात भारताने अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला होता.

अधिक वाचा – फिल्म ‘८३’ पाहून मंत्रमुग्ध झाला कर्णधार विराट कोहली; म्हणाला, ‘भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील…’

रवी शास्त्री यांचा नुकताच नोव्हेंबरमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून करार संपुष्टात आला. त्यांनी २०१७ पासून भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. २०२१ च्या टी२० विश्वचषकानंतर त्यांचा हा करार संपुष्टात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अनेक अविस्मरणीय विजय मिळवले. ऑस्ट्रेलियामध्ये दोन वेळा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रमही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने केला होता. शास्त्री यांनी यापूर्वी भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून देखील काम पाहिले आहे.

आता अशीही चर्चा आहे की, शास्त्री हे आयपीएलमध्ये एखाद्या संघाचे प्रशिक्षक म्हणून दिसू शकतात किंवा ते पुन्हा समालोचन क्षेत्रात उतरू शकतात.

शास्त्री यांनी आपल्या कारकिर्दीत ८० कसोटी आणि १५० वनडे सामने खेळले आहेत. त्यांनी ३८३० कसोटी धावा केल्या असून १५१ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्यांनी ३१०८ धावा केल्या असून १२९ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

नवीन वर्षातील पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याचा पराक्रम केलाय ‘या’ पठ्ठ्याने

‘विराटला टी२० कर्णधारपद सोडू नको, असं सांगण्यात आले होते’, निवड समीती प्रमुखांकडून स्पष्टीकरण

आयसीसीची टीम इंडियावर मोठी कारवाई, सेंच्यूरियन कसोटीतील ‘ही’ चूक भोवली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---