ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात आयसीसी वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. या विश्वचषकासाठी वेळापत्रकाची घोषणा मंगळवारी (27 जून) करण्यात आली. या विश्वचषकात यजमान भारतीय संघाला विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. भारतीय संघ बारा वर्षानंतर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करेल. अशात आता भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी भारताच्या अभियानात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दोन खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे.
हरभजन याने नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्याला विश्वचषकात भारतीय संघातर्फे कोण सर्वाधिक यशस्वी ठरेल असे विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला,
“अनुभवी खेळाडूंवर नक्कीच सर्वांचे लक्ष असेल. मात्र, ज्या प्रकारचा फॉर्म शुबमन गिलने मागील काही काळापासून दाखवला आहे, तो फॉर्म तो कायम राखू शकल्यास भारतीय संघ दमदार कामगिरी करेल. त्याचबरोबर रवींद्र जडेजा याने आयपीएलप्रमाणे गोलंदाजी केली आणि फलंदाजीतही फिनिशर म्हणून भूमिका निभावली तर, भारतीय संघासाठी हा बोनस ठरेल.”
आगामी विश्वचषकात अष्टपैलू रवींद्र जडेजा याला संधी मिळणे निश्चित आहे. तो संघाचा सर्वात अनुभवी अष्टपैलू असून, खेळाच्या तीनही विभागात योगदान देऊ शकतो. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये त्याने वीस बळी टिपले होते. तसेच फलंदाजीत फिनिशर म्हणून संघाला चॅम्पियन बनवण्यात तो आघाडीवर होता. दुसरीकडे, गिल या संपूर्ण वर्षात जबरदस्त कामगिरी करताना दिसला. चालू वर्षी खेळाच्या तिन्ही प्रकारात शतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक देखील त्याने साजरा केले. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप त्याने पटकावली होती.
(Harbhajan Singh Hoping Ravindra Jadeja And Shubman Gill Will Key Players In World Cup)
महत्वाच्या बातम्या –
नेदरलँड्सच्या विश्वचषक 2023 साठी आशा कामय! विक्रमजीत सिंगच्या शतकामुळे ओमान 74 धावांनी पराभूत
‘हा’ दिग्गज बनणार भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक! बांगलादेश दौऱ्याआधी स्वीकारणार जबाबदारी