मुंबई । भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी खेळाडू अनिल कुंबळे ही भारताची सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजीची जोडी आहे. या जोडगोळीने आपल्या फिरकीच्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक दिग्गज फलंदाजांना नाचवले आहे. दरम्यान, हरभजन सिंगने आपला सहकारी, वरिष्ठ खेळाडू अनिल कुंबळे यांच्यावर कौतुकाच्या फुलांची उधळण केली आहे.
हरभजन सिंगच्या मते, माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे हा भारताचा सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू होता. हरभजन आपल्या कारकीर्दीतील सर्वाधिक सामने अनिल कुंबळेसोबत खेळला आहे. दोघांनी मिळून भारताला अनेक सामने जिंकून दिले.
हरभजन सिंग म्हणाला, “माझ्या विचारानुसार अनिल भाई भारताचा सर्वात महान खेळाडू आहे. तो भारताचे सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू आहे. त्यांचे चेंडू जास्त वळण घेत नसल्याची टीकाही त्याच्यावर केली जायची, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्याजवळ दृढनिश्चय असेल तर आपण स्पिन न करताही फलंदाजाला बाद करू शकतो.”
“आम्ही दोघे मिळून अनेक वर्ष एकत्र क्रिकेट खेळलो. त्यामुळे मी स्वतःला सुदैवी समजतो. तो खरोखरच चॅम्पियन खेळाडू आहे.”
कुंबळेनी भारताकडून खेळताना कसोटीमध्ये सर्वाधिक 619 बळी टिपले. 271 वनडे मध्ये 337 बळी घेतले. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्यामध्ये मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न यांच्यानंतर अनिल कुंबळे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
या क्रिकेटपटूच्या वडिलांनीही नैराश्यात येऊन केली होती आत्महत्या
इंग्लंडच्या दिग्गज कर्णधाराने रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दिला ‘हा’ गुरुमंत्र
अखेर त्या पंचांनी सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याची चूक केली मान्य