भारताने एमएस धोनी याच्या नेतृत्वात 2011 साली वनडे विश्वचषक जिंकला. विश्वचषक जिंकण्यासाठी कर्णधार म्हणून एमएस धोनीची भूमिका महत्वाची राहिल होती आणि यासाठी त्याला श्रेय देखील मिळाले. दुसरीकडे भारतीय दिग्गज हरभजन सिंग याचे विश्वचषक विजयातील योगदान देखील महत्वाचे राहिले होते. पण तरीदेखील 2011 विश्वचषकानंतर हरभजनकडे निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केले. याच पार्श्वभूमीवर धोनीसोबत हरभजनचे संबंध बिघडल्याचेही बोलले जाते. आता याच पार्श्वभूमीवर माजी फिरकी गोलंदाजाने स्वष्टीकरण दिले आहे.
आयसीसी वनडे विश्वचषक 2011 मध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकन संघाला मात दिली आणि विश्वचषक जिंकला. एमएस धोनी (MS Dhoni) याने मारलेला विजयी षटकार आजही क्रिकेटचाहत्यांना आठवतो. फिरकीपटू हरभनज सिंग (Harbhajan Singh) या विश्वचषकातील 9 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याची भूमिका देखील संघासाठी महत्वाची ठरली होती. असे असले तरी विश्वचषक विजयाचे श्रेय हरभजन सिंगला तुलनने धोनीपेक्षा कमीच मिळाले.
अनेकदा असेही बोलले गेले की, हरभनजची कारकीर्द लवकर संबवण्यात धोनीचा हात होता. याच कारणास्तव दोनी आणि हरभजन यांच्यातील संबंध बिघडल्याचे बोलले जाते. पण एका मुलाखतीत बोलताना हरभजनने या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितेल. हरभजन म्हणाला, “माझ्यात आणि धोनीत वाद कशासाठी असतील. आम्ही एकत्र खेललो आहोत. तो माझा चांगला मित्र राहिला आहे आणि आजही आहे. फक्त तो त्याच्या आणि मी माझ्या आयुष्यात व्यस्त झालो आहे. त्यामुळे आमच्यात जास्त बोलणे होत नाही, पण याचा असा अर्ध नाही की, आमचे संबंध ठीक नाहीत.”
यावेळी हरभजन मजेत असेही म्हणाला की, “धोनीने माझी मालमत्ता घेतली नाहीये. पण हो, त्याच्या संपत्तीमध्ये मला रस आहे. विशेषतः त्याच्या फार्महाऊसमध्ये.” एवढे बोलून हरभजन मोठ्या हसू लागतो. दरम्यान, एमएस धोनी 2020 मध्ये निवृत्त झाला. निवृत्तीपर्यंत धोनी भारतीय संघाचा नियमित खेळाडू होता. पण हरभजनच्या बाबतीत असे होऊ शकले नाही. मोठा काळ संघातून बाहेर राहिल्यानंतर हरभजनने अखेर डिसेंबर 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी सध्या आयपीएल 2023च्या तयारीत आले, जो हंगाम 31 मार्च रोजी सुरू होईल.
(Harbhajan Singh on controversy with MS Dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेमिसनच्या जागी सिसांडा मगाला सीएसकेच्या ताफ्यात, जाणून घ्या नवख्या खेळाडूवर विश्वास दाखवण्याचे कारण
महिंद्रा IBA महिला बॉक्सिंग: भारताच्या निखत झरीन आणि मनिषा उप-उपउपांत्यपूर्व फेरीत