इंडियन प्रीमिअर लीग 2023 सर्वात यसस्वी चेन्नई सुपर किंग्स संघाने मंगळवारी (दि. 23 मे) इतिहास रचला. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला पराभवाची धूळ चारत विक्रमी 10व्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता हंगामातील एलिमिनेटर सामना बुधवारी (दि. 24 मे) लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने पीयुष चावलाविषयी वक्तव्य केले आहे.
लखनऊ विरुद्ध मुंबई संघातील अटीतटीचा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात पाच वेळचा विजेता मुंबई संघ आणि पहिल्या ट्रॉफीसाठी झगडणाऱ्या लखनऊ संघात अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी लढत होणार आहे. अशात या सामन्यात मुंबई इंडियन्स संघासाठी अनुभवी गोलंदाज पीयुष चावला (Piyush Chawla) ट्रंप कार्ड ठरू शकतो.
नुकतेच स्टार स्पोर्ट्सवर चर्चा करताना भारताचा माजी खेळाडू आणि सध्याचा समालोचक हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने पीयुष चावला याला मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाला हरभजन?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हरभजन म्हणाला की, “पीयुष चावला शानदार गोलंदाज आहे. त्याने यावर्षी प्रत्येक संघाच्या अनेक फलंदाजांना आपल्या फिरकीने चकवले आणि मुंबईला प्ले-ऑफपर्यंतचा प्रवास करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. मी आनंदी आहे की, त्याने यावर्षी धमाकेदार पुनरागमन केले. कारण, मागील वर्षी त्याला प्रत्येक संघ दुर्लक्षित करत होता. यावर्षी सर्व संघांचे म्हणणे आहे की, अनुभवापुढे काहीच नाही. पीयुषसारखा कुणीच नाहीये.”
चावलाची कामगिरी
खरं तर, मुंबई इंडियन्स संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज पीयुष चावला या हंगामात जबरदस्त गोलंदाजीने प्रत्येकाची मने जिंकत आहे. 34 वर्षांच्या वयात चावलाने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत युवा खेळाडूंपासून ते अनुभवी फलंदाजांपर्यंत सर्वांच्या विकेट्स काढल्या. त्याने एकूण 14 सामने खेळताना 20 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट हा 7.81 इतका राहिला. (harbhajan singh on piyush chawla said this know here ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ऋतुराजला लाज नाही…’, सामन्यानंतर आपल्याच संघसहकाऱ्यावर का संतापला दीपक चाहर? व्हिडिओत मिळेल उत्तर
मास्टरमाईंड धोनीने चार मिनिटे थांबवला खेळ! सीएसकेच्या विजयानंतर फुटले नव्या वादाला तोंड






