इंडियन प्रीमिअर लीग 2022 स्पर्धेच्या शेवटी तळाशी राहणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 हंगामात पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. आयपीएल 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात पार पडला. मंगळवारी (दि. 23 मे) चेपॉक स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नईने गुजरातला 15 धावांनी धूळ चारली. तसेच, विक्रमी तब्बल 10व्यांदा आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एन्ट्री केली. या चेन्नईच्या या विजयात फलंदाज आणि गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले.
या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड (Deepak Chahar And Ruturaj Gaikwad) हे एकमेकांची मुलाखत घेताना दिसत आहेत.
दीपक चाहर ऋतुराज गायकवाडला निर्लज्ज म्हणाला, पण का?
खरं तर, सीएसके संघाने शेअर केलेल्या या व्हिडिओत दीपक आणि ऋतुराज एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओत दीपक चाहर ऋतुराज गायकवाड याला निर्लज्ज म्हणताना दिसत आहे. दीपक म्हणाला की, “तू खूपच निर्लज्ज व्यक्ती आहेस. सामन्यातील सर्वोत्तम झेल पुरस्कार मला मिळाला पाहिजे होता, पण तू तो घेतला आणि मागील सामन्यात रायुडू भाईला मिळाला होता.”
यानंतर ऋतुराज म्हणतो की, “भावा प्रयत्न महत्त्वाचे असतात. माझी डाईव्ह होती, जी महत्त्वाच्या वेळी आली होती, पण तू तर सामन्याच्या शेवटी झेल घेतला होता.”
यावर दीपक म्हणतो की, “परंतु माझा झेलही डाईव्हचाच होता.” ऋतुराज म्हणतो की, “होय, तुझा झेल पाहताना समालोचक सर्वोत्तम क्षण दाखवण्यात व्यस्त झाले असतील, पण तुझा झेल चांगला होता आणि तू दुखापतीनंतर ज्याप्रकारे पुनरागमन केले आहे, ते शानदार आहे.”
https://www.instagram.com/reel/CsnGkWDsdET/?utm_source=ig_embed&ig_rid=7716969a-4217-4cef-91c7-4ba3434c1bdc
ऋतुराजला सामन्यातील सर्वोत्तम झेल पुरस्कार
गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात सीएसके संघाचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड याने डीप मिड विकेटवर शानदार झेल घेतला होता. या झेलाच्या मदतीने संपूर्ण सामन्याची दिशाच बदलली. खरं तर, अखेरच्या तीन षटकात गुजरातला विजयासाठी 39 धावांची गरज होती.
अशात धोनीने चेंडू मथीशा पथिराना याच्याकडे सोपवला. यावेळी विजय शंकर आणि राशिद खान आक्रमक फलंदाजी करत होते. मात्र, सामन्यात ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा तिसऱ्या चेंडूवर शंकरने एक शॉट खेळला. हा शॉट सीमारेषेच्या खूप पुढे पडला, पण ऋतुराजने सुपरमॅनप्रमाणे झेप घेत हा झेल पकडला. (ipl 2023 cricketer ruturaj gaikwad is shameless deepak chahar fumes after csk vs gt 1st qualifier see video )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मास्टरमाईंड धोनीने चार मिनिटे थांबवला खेळ! सीएसकेच्या विजयानंतर फुटले नव्या वादाला तोंड
“मुंबई आधी डेक्कन चार्जर्सने नेतृत्व करण्याची संधी दिली”, रोहितने केला मोठा खुलासा