टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) इंग्लंड आणि भारत हे दोन बलाढ्य संघ आमने-सामने होते. मात्र, इंग्लंडने या महत्त्वाच्या सामन्यात भारताला 10 विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अशात आता भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगचे भारतीय संघाबाबत वक्तव्य चर्चेत आहे. हरभजन सिंग याने हे वक्तव्य टी20 क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारताच्या फ्लॉप कामगिरीवरून केले आहे.
काय म्हणाला हरभजन सिंग?
माध्यमांशी बोलताना हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला की, “जर तुम्ही अशा व्यक्तीला संघात घेऊन याल, जो नुकताच टी20 क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे आणि या क्रिकेटप्रकाराची त्याला चांगली जाण आहे, तर ते उत्तम राहील. राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासाठी माझ्या मनात मोठा सन्मान आहे. ते माझे सहकारी आहेत. आम्ही एकत्र खूप क्रिकेट खेळले आहे. त्यांच्याकडे चांगली बुद्धी आहे, पण मला वाटते की, जर तुम्हाला द्रविडला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये प्रशिक्षकाच्या पदावरून हटवायचे नसेल, तर तुम्ही अशा व्यक्तीला त्यांच्या मदतीसाठी आणू शकता, जो नुकताच निवृत्त झाला आहे. इथे आशिष नेहरासारख्या क्रिकेटपटूची गरज आहे. तुम्ही पाहू शकता की, गुजरात टायटन्समध्ये राहून त्याने काय केले आहे.”
यावेळी रोहित शर्माबद्दलही हरभजन सिंग बोलला. तो म्हणाला की, जर पुढील कर्णधाराबद्दल चर्चा सुरू असेल, तर त्याची पहिली पसंद हार्दिक पंड्या असेल. तो म्हणाला की, “हार्दिकव्यतिरिक्त इतर कोणताच चांगला पर्याय नाहीये. तो या संघाचा सर्वोत्तम खेळाडू आहे. तुम्ही या संघात त्याच्यासारख्या इतर खेळाडूंनाही पाहायला आवडेल.”
आशिया चषकानंतर टी20 विश्वचषकातही भारतीय संघ फ्लॉप
भारतीय संघ दीर्घ काळापासून मोठ्या स्पर्धांमध्ये अपयशी ठरताना दिसत आहे. नुकतेच भारताला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातही स्थान मिळवता आले नव्हते. टी20 विश्वचषकात संघ अंतिम सामन्याच्या जवळ पोहोचला, परंतु इथे त्यांना साखळी फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध संघर्ष करून नजीकचा विजय मिळवता आला होता.
अशात आता हरभजन सिंग याने मांडलेले त्याचे मत कितपत परिणामकारक ठरते आणि संघाला मार्गदर्शक मिळतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Harbhajan Singh On Team India says india needs a mentor for t20 cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बिलियन डॉलर इंडस्ट्रीचा संघ मागेच राहिला अन् आम्ही…’, पीसीबी अध्यक्षांनी भारताच्या जखमेवर चोळलं मीठ
‘या’ अभिनेत्रीमुळे शोएब मलिक सानिया मिर्झाला देणार घटस्फोट! पाहा दोघांचे बोल्ड फोटो