---Advertisement---

“निवडकर्त्यांनी सूर्यकुमारची खेळी पहिली असावी…” माजी दिग्गजाने निवड समीतीला फटकारले

---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 48 वा सामना बुधवारी (28 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट फलंदाजी केली. या सामन्यातच नव्हे, तर संपूर्ण हंगामातच त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र, असे असूनही त्याची नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नाही. त्यामुळे भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने निवडकर्त्यांवर निशाणा साधला आहे.

या सामन्यात सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 79 धावा केल्या. त्याने केलेल्या खेळीच्या जोरावर मुंबईने बेंगलोरने दिलेले 165 धावांचे लक्ष्य 19.1 षटकांत सहजपणे गाठले.

हरभजनने सूर्यकुमारचे कौतुक करत निवडकर्त्यांवर साधला निशाणा

सुर्यकुमारच्या शानदार अर्धशतकी खेळीनंतर हरभजनने ट्विट केले की, “सूर्यकुमारने चांगली खेळी खेळला. निवडकर्त्यांनी त्याची ही खेळी पहिली असावी, ही अपेक्षा.”

याआधीही हरभजनने केले होते ट्विट

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. मात्र,भारतीय संघात सूर्यकुमार यादवचे नाव नव्हते. त्यामुळे हरभजनने संघ निवडीबाबत ट्विट केले होते की, “संघात निवड होण्यासाठी सूर्यकुमारने आणखी काय करायला पाहिजे, हे मला माहित नाही. रणजी करकंड आणि आयपीएलमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मला वाटते भिन्न लोकांसाठी भिन्न नियम आहेत.”

आयपीएलच्या 13 व्या हंगामात केली उत्कृष्ट कामगिरी
सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 12 सामन्यात 40.22 च्या सरासरीने 362 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सलामीवीर क्विंटन डिकॉकनंतर दुसऱ्या स्थानी आहे.

सूर्यकुमारची देशांतर्गत क्रिकेटमधील कारकीर्द
त्याची देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमधील कामगिरीही चांगली आहे. त्याने 77 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 44.01 च्या सरासरीने 5326 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, यादवने अ दर्जाच्या सामन्यांमध्ये 35.26 च्या सरासरीने 2447 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने दोन शतके आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बंदे मै दम हैं! सुर्यकुमारला मिळाली विरेंद्र सेहवागकडून कौतुकाची थाप

“मजबूत राहा आणि संयम ठेव”, भारतीय प्रशिक्षकाचा सूर्यकुमार यादवला सल्ला

भारतीय संघाची जर्सी घालण्यासाठी सुर्यकुमारने अजून काय करायला पाहिजे? माजी क्रिकेटपटू संतापला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---