Skip to content
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

Home

Web Stories

Google News

WhatsApp
---Advertisement---
क्रिकेट टॉप बातम्या भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

“नटराजन ‘या’ मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज”, माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने

by Akash Jagtap
Published On: डिसेंबर 8, 2020 8:25 am
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला शुक्रवारी (4 डिसेंबर) सुरुवात झाली. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. या दोन्ही विजयात भारतीय वेगवान गोलंदाज टी नटराजनने मोलाची भूमिका बजावली. त्याने त्याच्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधले. क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गज त्याचे कौतुक करत आहेत.

कठोर परिश्रम केल्यास काहीही शक्य

हरभजन म्हणाला की, “नटराजनसाठी मी खरोखर आनंदी आहे. ज्या प्रकारे तो आतापर्यंत जीवन जगला आहे आणि सध्या तो ज्या प्रकारे प्रदर्शन करत आहे, हे खरोखर विलक्षण आहे. यावरून असे लक्षात येते की, आपण स्वत: वर विश्वास ठेवला आणि कठोर परिश्रम केले, तर काहीही शक्य आहे.”

“नटराजन या मालिकेतील यशस्वी गोलंदाज”

नटराजनची प्रशंसा करताना हरभजन म्हणाला की, “या (टी20) मालिकेतील तो सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याचप्रमाणे तो या मालिकेत प्रमुख स्तंभ ठरला. जेव्हा भारतीय संघाला गडी बाद करण्याची गरज असते, तेव्हा नटराजनने योग्य वेळी गडी बाद करून स्वतः ला सिद्ध करून दाखवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकून राहण्याची आणि भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता असल्याचे त्याने दाखवून दिले. तो आत्मविश्वासाने परिपूर्ण खेळाडू आहे. त्याला टीव्हीवर खेळताना पाहिल्यास जाणवते की, फलंदाज आक्रमक फटके खेळतील याची भीती त्याच्या मनात मुळीच नाही. ही अतिशय खास बाब आहे. या स्तरावर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आत्मविश्वास.”

नटराजन सामनावीर पुरस्काराचा मानकरी होईल, हरभजनचा विश्वास

नटराजन सामनावीर पुरस्काराचा मानकरी होऊ शकतो, असा हरभजनला विश्वास आहे याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरल्यास त्याच्या आत्मविश्वसात आणखी भर पडेल. ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना मालिकावीर पुरस्कार जिंकणे, ही खूप मोठी बाब आहे. यामुळे त्याचे मनोबल नक्कीच वाढेल. तो ज्या परिस्थितीतून आला आहे आणि आता भारतीय संघाकडून ज्याप्रकारे कामगिरी करतोय, ही त्याची कथा अद्भुत आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

हे नाही पाहिलं तर काय पाहिलं! भक्कम बचाव असलेला पुजारा अफलातून चेंडूवर त्रिफळाचीत

लाईव्ह सामन्यादरम्यान विराटने केले धोनीला मिस; कोहलीच्या रिऍक्शनने जिंकली सर्वांची मने; Video भन्नाट व्हायरल

धोनीच्या पत्नीने अस्वलाला चारले अन्न, तर सिंहाच्या छाव्याला पाजले दूध; Video तुफान व्हायरल

ट्रेंडिंग लेख-

भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर

आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?

गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग

australia harbhajan singh india information in marathi marathi T Natarajan ऑस्ट्रेलिया टी नटराजन भारत मराठी मराठीत माहिती हरभजन सिंग

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Latest Stories

मोहम्मद सिराजचा कहर! माजी संघाविरुद्ध विक्रमी प्रदर्शन, झहीर खानलाही मागे टाकले

मोहम्मद सिराज आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी भावूक; म्हणाला, 7 वर्षांपासून मी…

कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद : कोण मारणार बाजी? पाहा कोणाचं पारडं जड

---Advertisement---

Latest News

एप्रिल 3, 2025

मोहम्मद सिराजचा कहर! माजी संघाविरुद्ध विक्रमी प्रदर्शन, झहीर खानलाही मागे टाकले

मोहम्मद सिराज आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी भावूक; म्हणाला, 7 वर्षांपासून मी…

एप्रिल 3, 2025

कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद : कोण मारणार बाजी? पाहा कोणाचं पारडं जड

एप्रिल 3, 2025

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! टीम इंडियाचे आगामी हंगामाचे वेळापत्रक जाहीर

एप्रिल 3, 2025

जयस्वालच्या पाठोपाठ सूर्यकुमारही मुंबई सोडणार? खुद्द सूर्यानं दिलं उत्तर!

एप्रिल 3, 2025

RCB vs GT: हा ठरला गुजरातच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

एप्रिल 3, 2025

Mahasports.in – Get the latest sports news, live scores, match analysis, player insights, and exclusive updates from the world of sports.

India News

World News

Business News

Sports News

About Us

Contact Us

Disclaimer

Privacy policy

Follow Us On Social Media

Get Latest Update On Social Media

© Powered by ContentOcean Infotech Private Limited.