आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जात आहे. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग सध्या त्याची आयपीएल फ्रॅंचायझी कोलकाता नाइट रायडर्स सोबत आहे. अशातच हरभजन सिंगसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. हरभजनकडे भारतीय संघासोबत क्रिकेट खेळण्याचा मोठा अनुभव आहे. याच पार्श्वभूमीवर त्याला फ्रान्सच्या एका युनिव्हर्सिटीने क्रीडा क्षेत्रातील पीएचडी प्रदान केली आहे.
हरभजनला कार्यक्रमासाठी फ्रान्सला जाता आले नाही
फ्रान्सची युनिव्हर्सिट इकोल सुपीरियेयूरे रोबर्ट डी सोर्बोनने हरभजन सिंगला क्रीडा क्षेत्रात पीएचडी डिग्री दिली आहे. हरभजन सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या बयो बबलमध्ये असल्यामुळे त्याला या पदवी प्रदान कार्यक्रमासाठी उपस्थित राहता आले नाही. ही युनिव्हर्सिटी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना पीएचडी प्रदान करत असते.
हरभजनचा सिंगचा भावनिक संदेश
त्याला मिळालेल्या या पीएचडीविषयी बोलताना त्याने सांगितले की, “जेव्हा एखादी संस्था तुम्हाला सन्मान देते, तर तुम्ही तो खूप विनम्रतेने स्वीकार करता. जर मला युनिव्हर्सिटीद्वारे मानद क्रीडा डॉक्टरेट डिग्रीने सन्मानित केले आहे, तर ते यामुळे की, मी क्रिकेट खेळतो आणि लोकांनी यासाठी प्रेम आणि स्नेह दिला आहे. या डिग्रीमुळे मला सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे.”
Humble and Honoured 🙏 French University confers Harbhajan Singh with honorary PhD in Sports https://t.co/DhSmjQZ4Ck via @timesofindia
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 8, 2021
दरम्यान, हरभजनला केकेआरने दोन कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. तो या हंगामात संघासाठी एकूण तीन सामने खेळला आहे. त्याने हे तिन्ही सामने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खेळले असून यामध्ये एकही विकेट घेतलेला नाही.
हरभजन मागच्या बऱ्याच काळापासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. असे असले तरी, त्याने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. हरभजनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत भारतीय संघासाठी १०३ सामने खेळले आणि ४१७ विकेट्स मिळवल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २३६ सामने खेळले आणि २६९ विकेट्स घेतल्या आहे. तसेच त्याने खेळलेल्या २८ टी २० सामन्यांमध्ये २५ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेण्याचा विक्रमही हरभजनच्या नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार मनीष पांडेनेही लढवली धोनीसारखीच युक्ती अन् पोलार्डची मिळवली विकेट, पाहा व्हिडिओ