---Advertisement---

हरभजन म्हणतो; कॉंग्रेस सरकारला दोष देऊन काय उपयोग, मी या पुरस्कारासाठी पात्रच नाही

On: रविवार, जुलै 19, 2020 11:45 AM
---Advertisement---

मुंबई । गतवर्षीही पंजाब सरकारने हरभजन सिंगचे  नाव खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवले नाही म्हणून बरीच चर्चा झाली होती. आता सन 2020 मध्ये बरेच लोक फिरकीपटू हरभजन सिंग याला फोन करुन पंजाब सरकारने त्याचे नाव खेलरत्न म्हणून का पाठवत नाही, असा सवाल करीत आहेत. आता हरभजनने हे उत्तर एका ट्वीटच्या माध्यमातून दिले आणि स्पष्टपणे सांगितले की, ‘त्यांची कोणतीही चूक नाही. कारण तो खेलरत्नासाठी पात्र नाही.’

2019 मध्ये पंजाब सरकारनेही भज्जी यांचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी पाठविले नव्हते. त्यावेळी तो पुरस्कारासाठी पात्र होता. त्याने आता ट्वीट करून लिहिले आहे, “माझ्या प्रिय मित्रांनो, मला पंजाब सरकारने खेल रत्न नामांकनातून माझे नाव का मागे घेतले याबद्दल बरेच कॉल आले आहेत. सत्य हे आहे की मी खेलरत्न साठी पात्र नाही, कारण या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शेवटची तीन वर्षे कामगिरी विचारात घेतली जाते.

दुसर्‍या ट्वीटमध्ये हरभजन म्हणाला, “येथे पंजाब सरकारची कोणतीही चूक नाही, कारण त्यांनी माघार घेत माझे नाव परत घेऊन बरोबर केले आहे. मीडियातील मित्रांनी कोणतेही अंदाज लावू नये.

हरभजन बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. 2011 च्या विश्वचषकानंतर हरभजन सिंग संघात आत बाहेर राहू लागला. तो 2012 च्या टी20 विश्वचषक संघाचा भाग होता पण 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला स्थान मिळाले नाही. 2015 च्या विश्वचषकातही त्याची निवड झाली नाही. हरभजनने शेवटचा वनडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑक्टोबर 2015 मध्ये खेळला होता. तो 2016 च्या टी 20 विश्वचषक संघातही होता पण संपूर्ण स्पर्धेत ड्रेसिंगरूममध्ये बसून होता. मार्च 2016 मध्ये त्याने युएईविरुद्ध अंतिम टी 20 सामना खेळला होता. हरभजनने 103 कसोटी सामन्यांमध्ये 417 आणि 236 एकदिवसीय सामन्यात 269 बळी घेतले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---