भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याला भारतीय संघासह आयपीएलचाही दिग्गज म्हणून ओळखले जाते. आयपीएल मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो पहिल्या पाचात दिसतो. आयपीएलचा पुढील हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याआधी प्रसारण वाहिनीशी बोलताना हरभजनने आयपीएलमधील आपले काही अनुभव सांगितले. चेन्नई सुपर किंग्ससोबत घालवलेली दोन वर्ष आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष होती अशी कबुली त्याने दिली.
आयपीएलच्या आगामी हंगामाआधी हरभजन प्रसारण वाहिनीशी चर्चा करत होता. यावेळी त्याला सीएसकेसोबत घालवलेल्या दिवसांबाबत विचारण्यात आले. त्यावर बोलताना तो म्हणाला,
“मी म्हणेल ती दोन वर्ष म्हणजे माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम दोन वर्षे होती. तिथे विजय पराभवाने फारसा फरक पडत नव्हता. संघ पराभूत झाला तरी सर्वजण आनंदी राहत. केवळ खेळाडूच नव्हे तर आमच्या सोबत असणारे आमचे कुटुंब देखील अगदी सहजतेने त्या संपूर्ण कॅम्पमध्ये वावरत होते. ते दिवस आम्ही खूप आनंदात घालवले. न विसरण्यासारखे ते दिवस होते.”
हरभजन सिंग नेहमीच भारतीय संघाचा कर्णधार राहिलेल्या तसेच सीएसकेचा कर्णधार असलेल्या एमएस धोनी याचे कौतुक करताना दिसला आहे. धोनी भारतीय संघाचा कर्णधार असताना हरभजन 2007 टी20 विश्वचषक तसेच 2011 वनडे विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. हरभजनने 2018 व 2019 अशी दोन वर्ष सीएसके संघात घालवली होती. त्यानंतर दोन वर्ष तो कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळला. त्याआधी हरभजन 2008 ते 2017 अशी 10 वर्ष मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्याने एका हंगामात मुंबईचे नेतृत्व देखील केले होते.
(Harbhajan Singh Said My CSK Days Was Best In Cricket Carrier)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विन-जडेजा की अक्षर? WTC फायनलमध्ये कोणाला मिळणार जागा? वरिष्ठ खेळाडूने दिले उत्तर
शोएब अख्तरचे ‘हे’ विधान चर्चेत, जाणून घ्या आधार कार्डविषयी काय म्हणाला पाकिस्तानी दिग्गज