भारतीय क्रिकेट संघाची निवड होताना एमएस धोनीला कायमच विशेष वागणूक देत असल्याचा जोरदार आरोप भारताचा महान फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने केला आहे.
भारताच्या आजपर्यंतच्या सर्वात यशस्वी माजी कर्णधार असलेल्या धोनीची भारतीय संघात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर हरभजनचे हे वक्तव्य आले आहे. भारतीय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी काल धोनीच्या निवडीवर म्हटले होते की धोनीकडे फक्त फलंदाजीचा गन नसून त्याच्याकडे रणनीती आखण्याची योग्य क्षमता असून, यामुळे त्याने अनेकदा सामना आपल्याबाजूने झुकवला आहे.
हरभजनने म्हटले आहे की तोही एक सिनियर खेळाडू असून त्याच्याकडे फक्त फलंदाजी किंवा गोलंदाजी सोडून अनेक गोष्टी आहेत ज्या एकहाती सामना फिरवून देऊ शकतात. परंतु हे निवड समिती कधीच ध्यानात घेत नाही.
“हे खार आहे की धोनीकडे फलंदाजी सोडूनही अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तो सामना एकहाती फिरवू शकतो. परंतु अगोदर ज्याप्रमाणे तो खेळायचा तसा तो आता खेळत नाही हेदेखील तितकंच खरं आहे. धोनी कर्णधार राहिला असल्याने त्याला खेळ चांगला कळतो आणि ही त्याची जमेची बाजू आहे, ” असेही हरभजन पुढे म्हणतो. ” जेव्हा माझी वेळ येते तेव्हा माझ्या अन्य गोष्टी विचारात घेतल्या जात नाही. ”
आपल्या भूतकाळातील कामगिरीचं उदाहरण देऊन हरभजन म्हणतो ” मीसुद्धा गेल्या १९ वर्षांपासून भारतीय संघाकडून खेळत आहेत. आम्हीदेखील अनेक सामने जिंकले आहेत. दोन वर्ल्ड कपही जिंकले आहेत. पण हीखास वागणूक, अधिकार फक्त काही खेळाडूंनाच, आणि इतरांना नाही असं का ? आणि ज्यांनी ही विशेष वागणूक मिळत नाही त्यातील एक मी आहे. असं होण्यामागे काय कारण आहे माहित नाही?
“आम्ही आपयपीएल सारख्या स्पर्धा संघात स्थान मिळावं म्हणून खेळतो. अगदी गंभीरच उदाहरण घ्या. त्याच्या इतका सातत्य असलेला खेळाडू नसेल. तरी त्यालाही माझ्यासारखीच वागणूक दिली जाते. ”
“मला माझ्या कमतरता माहित नाही. निवड समिती सदस्यही सांगायचं कष्ट घेत नाहीत. परंतु मला एवढं पक्क माहित आहे मी मला जेव्हा संधी मिळते तेव्हा मी माझं १००% देतो”