आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी भारताने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली. विश्वचषकासाठी भारतीय संघात अशा अनेक खेळाडूंच्या नावाचा समावेश नाही, ज्यांना निवडले जाण्याची शक्यता होती. त्या खेळाडूंपैकी एक संजू सॅमसन आहे. संजू याला भारतीय संघात संधी न दिल्याचे भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने समर्थन केले.
विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर अनेक माजी खेळाडू यावर प्रतिक्रिया देत आहेत. हरभजन सिंग याने एका कार्यक्रमात बोलताना म्हटले,
“संजू सॅमसन एक दर्जेदार खेळाडू आहे. मात्र आत्ताच्या परिस्थितीत पाहिल्यास सूर्यकुमार यादव त्याच्यापेक्षा उजवा ठरतो. याच कारणाने सूर्यकुमार विश्वचषक संघात सामील झाला. पाचव्या सहाव्या क्रमांकावर सूर्या अशी फलंदाजी करू शकतो जशी सध्या भारतात सध्या कोणीही करू शकत नाही. दुसरीकडे संजूला मोठी जोखीम पत्करून खेळावे लागते. टी20 क्रिकेटचा विचार करून सूर्यकुमारला संघात जागा दिली असली तरी ती योग्य वाटते.”
कधी होणार विश्वचषकाला सुरुवात?
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला पुढील महिन्यात 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ भाग घेणार असून 45 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वनडे विश्वचषक 2023साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल
(Harbhajan Singh Speaks On Why Suryakumar Yadav Picked Ahead Sanju Samson)
महत्वाच्या बातम्या –
जुन्या फॉर्मात परतला भुवनेश्वर कुमार! यूपी टी-20 लीगमध्ये घेतल्या एकापेक्षा एक विकेट्स
धोनी-विराट नाहीत भारताचे सर्वोत्तम कर्णधार! गौतम गंभीर आपल्या ‘या’ वक्तव्याने पुन्हा चर्चेत