भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हा गेल्या काही सामन्यांपासून निराशाजनक कामगिरी करत आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. परंतु त्याचे गेल्या काही सामन्यांचे प्रदर्शन पाहता त्याला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात संधी देण्यात आली नव्हती. या कठीण काळात त्याला भारतीय फिरकीपटू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहकारी खेळाडू हरभजन सिंगने त्याला समर्थन दिले आहे.
हरभजन सिंग या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने आपल्या संघातील सहकारी खेळाडू कुलदीप यादवला समर्थन करत म्हटले की,” मला कुलदीपच्या गोलंदाजीमध्ये कुठलीच कमी जाणवत नाही. त्याने भारतीय संघासाठी आणि कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. मला विश्वास आहे की, तो कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी चांगली कामगिरी करेल आणि त्यानंतर तो भारतीय संघासाठी देखील चांगली कामगिरी करेल.”
कुलदीप यादवने आतापर्यंत ४५ आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने ४० गडी बाद केले आहेत. तसेच २० धावा देत ४ गडी बाद, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा दुसरा सामना मंगळवारी ( १३ एप्रिल ) मुंबई इंडियन्स संघासोबत रंगणार आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभूत केले होते. तर मुंबई इंडियन्स संघाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सलामीच्या सामन्यात पराभूत केले होते. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थानविरुद्ध शेवटचे षटक टाकणाऱ्या अर्शदीपने सांगितले संजू सॅमसन विरुद्ध होता ‘हा’ प्लॅन
असं कोण करतं भावा? नाणेफेकीवेळी संजू सॅमसनने केलं असं काही, केएल राहुलसह रेफरीही अचंबित






