---Advertisement---

मयंक अगरवालने IPL 2022मध्ये का केली खराब कामगिरी? हरभजन सिंगने दिले स्पष्टीकरण

Mayank-Agarwal
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा १५वा हंगाम नुकताच संपला आहे आणि गुजरात टायटन्स यावर्षीचा विजेता संघ नला आहे. या हंगामात नेहमीप्रमाणे काही युवा खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली, तर काही दिग्गज अपयशी ठरले. पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अगरवाल देखील या सामन्यात त्याच्या प्रतिभेनुसार प्रदर्शन करू शकला नाही. मयंकच्या खराब प्रदर्शानविषयी बोलताना माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने खास प्रतिक्रिया दिली.

कर्णधार मयंक अगरवाल (Mayank Agarwal) ज्या पद्धतीने खराब प्रदर्शन करत होता, त्याच पद्धतीने त्याचा संघ पंजाब किंग्जला देखील चांगले प्रदर्शन करता आले नाही. प्लेऑफमध्ये पंजाबला स्थान मिळाले नाही. मयंकच्या निराशाजनक प्रदर्शनाविषयी हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला की, तो मयंकच्या या खराब फॉर्ममुळे खूप निराश आहे. हरभजनच्या मते कर्णधारपदाच्या दबावामुळे मयंक चांगले प्रदर्शन करू शकला नाही.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, “जर आपण मयंक अगरवालविषयी बोललो, तर मी मनात विचार केला की, त्याला काय झाले आहे? तो एवढा चांगला खेळाडू आहे. मला वाटते की कर्णधारपद मिळाल्यापासून त्याच्यावर दबाव आला आहे. सलामीवीरापासून तो थेट चौथ्या क्रमांकावर खेळू लागला. या हंगामात मयंक मोकळेपणाने खेळू शकला नाही. त्याला मोकळीक मिळाली पाहिजे होती. जर ती मिळाली असती, तर तो निश्चितच चांगले प्रदर्शन करू शकला असता.”

दरम्यान, मयंक यावर्षी आयपीएलमध्ये त्याचा संघ पंजाब किंग्जसाठी सर्वात मोठी अडचण ठरला. संपूर्ण हंगामात त्याने खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये अवघ्या १९६ धावा केल्या. कर्णधार आणि फलंदाज म्हणून तो पूर्णपणे अपयशी ठरला. संघाचा विचार करून त्याने सलामीसाठी येण्याचा टाळले आणि मध्यक्रमात फलंदाजी करू लागला. आता अशी माहिती समोर येत आहे की, पुढच्या हंगामात शिखर धवनला पंजाब किंग्जचा कर्णधार बनवले जाऊ शकते. धवनकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

मोईन अलीसाठी आनंदाची बातमी! लवकरच होणार ‘ब्रिटिश’ पुरस्काराने सन्मान, संघातील पुनरागमनाच्या वाटाही मोकळ्या

मुंबईने नारळ दिलेला हार्दिक पंड्या असा झाला आयपीएल विजेता कर्णधार

मुंबईच्या खराब कामगिरीवर हळहळला पोलार्ड, भावूक पोस्ट लिहीत म्हणाला, ‘नुकसानीचा अंदाज लावणे कठीण’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---