क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर हरभजन सिंग पुढे काय करणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. आता हरभजन सिंगने स्वतः याबाबत मोठा खुलासा केला आहे.
भारतीय कसोटी संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा चौथा गोलंदाज हरभजन सिंग याने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. क्रिकेटच्या खेळपट्टीवर त्याने अनेक दिग्गजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्यात हा दिवस नक्की येत असतो.
https://www.instagram.com/p/CXviR9nB0kJ/?utm_source=ig_web_copy_link
हरभजन सिंगला राजकारणात प्रवेश करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने उत्तर देत म्हटले की, “‘मी सध्या निवडणूक लढवणार नाही, पण राजकारणात उतरणार की नाही, याबाबत अजूनही निर्णय घेतला नाहीये. क्रिकेटपेक्षा मोठे काय असू शकते? हे मला ठरवायचे आहे. मी तो मार्ग निवडण्याचा प्रयत्न करेन ज्यातून मी लोकांसाठी काही करू शकेन. मी त्यांच्यासाठी काम करू शकतो. लोकांनी मला खूप प्रेम दिले आणि नेहमीच पाठिंबा दिला. त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी मी काही करू शकलो तर मला आनंद होईल. ”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी निवृत्ती जाहीर करण्याचा पंजाब निवडणूकांसोबत काही एक संबंध नाहीये. माझ्या कानी भरपूर गोष्टी आल्या की, मी राजकारणात प्रवेश करणार आहे. परंतु सध्या असे काहीच नाहीये. मी पंजाबी निवडणुकीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. बघूया पुढे काय होते, मी जेव्हाही असा निर्णय घेईन तेव्हा मी माझ्या चाहत्यांना नक्की सांगेन.” (harbhajan Singh statement on politics joining)
https://www.instagram.com/tv/CX_GM7QI5RS/?utm_source=ig_web_copy_link
हरभजन सिंगची कारकीर्द
हरभजन सिंगने आपल्या कारकीर्दीत एकूण १०३ कसोटी क्रिकेट सामने खेळले ज्यामध्ये त्याने एकूण ४१७ गडी बाद केले. तसेच २३६ वनडे सामन्यांमध्ये त्याने २६९ गडी बाद केले होते. तर २८ टी२० सामन्यात त्याने २५ गडी बाद केले होते.
महत्वाच्या बातम्या :
‘भारतीय संघ भित्रेपणाने खेळला, असे वाटले’, टी२० विश्वचषकातील कामगिरीबाबत रवी शास्त्रींचे मोठे भाष्य
रोहित-विराट वादाविषयी निवडसमिती म्हणातायेत, “ते दोघे…”
हे नक्की पाहा :