---Advertisement---

गुलाबी चेंडूबाबत हरभजन सिंगने केले मोठे भाष्य, म्हणाला…

On: बुधवार, नोव्हेंबर 20, 2019 3:42 PM
---Advertisement---

22 नोव्हेंबर पासून ईडन गार्डन, कोलकाता येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात दुसरा कसोटी सामना (2nd Test Match) सुरू होणार आहे. हा कसोटी सामना दिवस-रात्र कसोटी (Day-Night Match) सामना असणार आहे.

भारताचा हा पहिलाच दिवस – रात्र कसोटी सामना असल्याने हा सामना भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघ कसोटी इतिहासात प्रथमच गुलाबी चेंडूने खेळणार आहे. या सामन्याबद्दल अनेक दिग्गजांनी आपले मत दिले आहे.

त्याचबरोबर भारताचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंगनेही (Harbhajan Singh) गुलाबी चेंडूने सुरू होणाऱ्या या कसोटी सामन्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. हरभजनने रिस्ट स्पिनर्ससाठी (मनगटाचा वापर करत गोलंदाजी करणारे फिरकीपटू) गुलाबी चेंडू उपयुक्त असल्याचे सांगितले आहे.

“गुलाबी चेंडूची शिवण ओळखणे आणि खेळणे फारच अवघड आहे. त्यामुळे रिस्ट स्पिनर गोलंदाजांना याचा फायदा होईल. असे असले तरी संघात कोणाला खेळवायचे हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय असेल. त्यामुळे मी जास्त काहीही सांगू शकत नाही,” असे पीटीआयशी बोलताना हरभजन म्हणाला.

हरभजनने संघा बाहेर बसलेल्या कुलदीप यादवचाही (Kuldeep Yadav) उल्लेख केला.

कोलकाता येथे 3.30 ते 4.30 दरम्यान सूर्यास्ताची वेळ आहे. ही वेळ वेगवान गोलंदाज जास्तीत जास्त विकेट घेण्यासाठी ओळखली जाते. परंतु, जर भविष्यात आपल्याला अधिक दिवस-रात्र कसोटी सामने खेळायचे असतील तर आपल्याला फिरकीपटूंबद्दल अधिक माहिती घेणे आवश्यक आहे, असे हरभजन म्हणाला.

जर तुम्हाला दुलीप करंडक आठवत असेल, तर कुलदीपची रिस्ट स्पिन गोलंदाजी कोणालाही खेळता आली नव्हती. त्या मोसमात लेग स्पिनर्सनी बरेच विकेट्स मिळवले होते. जर तुम्ही बोटांचा वापर करुन फिरकी गोलंदाजी करत असाल तर फलंदाजाला चेंडूचे शिवण दिसेल. परंतु, तुम्ही रिस्ट स्पिनर असाल तर फलंदाज चेंडूची शिवण पाहू शकणार नाही, असेही हरभजन म्हणाला.

मुथय्या मुरलीधरनसारखा (Muttiah Muralitharan) गोलंदाज या चेंडूने अधिक चांगली कामगिरी करू शकला असता. कारण, तो देखील शिवण लपवून गोलंदाजी करीत असे.दिवस-रात्र कसोटीमध्येही तो खूप प्रभावी ठरला असता, असे श्रीलंकेचा अनुभवी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचे कौतुक करताना हरभजन सिंग म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---