---Advertisement---

काय सांगता? भज्जीने विराटला म्हटले होते दुसरी आई? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

On: गुरूवार, डिसेंबर 30, 2021 2:26 PM
bhajji-virat
---Advertisement---

काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले आहे. तब्बल २३ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या निर्णयानंतर अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक करत त्याला शुभेच्छा देखील दिल्या होत्या. दरम्यान त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागली आहे. (Harbhajan Singh retirement)

हरभजन सिंग आणि विराट कोहली हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. विराट कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून तो हरभजन सिंग सोबत खेळत आहे. दोघांनी मिळून भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. अशाच खास मित्राला एकदा हरभजन सिंगने ट्विट करत वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु माध्यमांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला होता. ज्याचा फोटो हरभजन सिंगने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

हरभजन सिंग हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतो. तो मजेशीर फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

त्याने लिहिले होते की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विराट कोहली, ब्रदर फ्रॉम अनादर मदर.” या ट्विटचा चुकीचा अर्थ घेत एका वृत्तपत्राने चुकीची हेडलाईन दिली होती. ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, “भज्जीने विराटला दुसरी आई म्हटले.” हा जुना फोटो असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Harbhajan Singh viral tweet)

हरभजन सिंगची कारकीर्द (Harbhajan Singh Stats) 
हरभजन सिंगने आपल्या कारकीर्दीत एकूण १०३ कसोटी क्रिकेट सामने खेळले ज्यामध्ये त्याने एकूण ४१७ गडी बाद केले. तसेच २३६ वनडे सामन्यांमध्ये त्याने २६९ गडी बाद केले होते. तर २८ टी२० सामन्यात त्याने २५ गडी बाद केले होते.

महत्वाच्या बातम्या :

टीम इंडियासाठी ‘पुढील वरीस मोक्याच’! टी२० विश्वचषकासह खेळणार ‘या’ महत्वाच्या मालिका

नव्या आयसीसी क्रमवारीत अश्विनने उंचावला टीम इंडियाचा झेंडा; रोहित-विराट ‘या’ क्रमांकावर

हे नक्की पाहा : टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं |

टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं | HARBHAJAN FINED IN NEW ZEALAND

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---