सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) पार पडणार आहे. दरम्यान, भारतीय संघातून बाहेर असलेला हरभजन सिंग देखील क्रिकेटचा सामना खेळण्यात व्यस्त आहे. त्याचा गल्ली क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हरभजन सिंगला तुम्ही आतापर्यंत गोलंदाजी करून फलंदाजांची दांडी उडवताना पाहिलं असेल. परंतु, कधी यष्टीचा मागे राहून अप्रतिम झेल टिपताना पाहिलं आहे का? सध्या हरभजन सिंग लहान मुलांसोबत गार्डनमध्ये क्रिकेट खेळताना दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फलंदाज शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो. परंतु, चेंडू बॅटचा कडा घेतो आणि यष्टिरक्षण करत असलेल्या हरभजन सिंगच्या हातात जातो. हरभजन सिंगच्या हातून पहिल्यांदा हा झेल सुटतो. परंतु, दुसऱ्या प्रयत्नात तो अप्रतिम झेल टिपतो. या व्हिडिओमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा समालोचन करताना दिसून येत आहे. हा झेल टिपल्यानंतर ‘सिंग इज किंग.’ ही आकाश चोप्राची पहिली प्रतिक्रिया होती.
अप्रतिम झेल टिपल्यानंतर हरभजन सिंग भांगडा करताना दिसून आला. त्यानंतर त्याने संघ सहकाऱ्यांसोबत जल्लोष देखील साजरा केला. हा व्हिडिओ २ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
Gully 🏏 cricket with Mr Chopra’s commentary @cricketaakash 👌👏 @StarSportsIndia pic.twitter.com/OscHstdsiz
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 18, 2021
हरभजन सिंगच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १०३ कसोटी सामन्यात ४१७ गडी बाद केले आहेत, तर २३६ वनडे सामन्यात २६९ आणि २८ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २५ गडी बाद केले आहेत. गोलंदाजीसह फलंदाजी करताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २ शतक आणि ९ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच प्रथम श्रेणीमध्ये ७८० गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ ‘या’ ३ खेळाडूंना करू शकतात रिटेन
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर, विम्बल्डनबाबतही दिली महत्त्वपूर्ण अपडेट