---Advertisement---

‘तो’ धक्कादायक व्हिडिओ पाहून हरभजन सिंग भडकला; म्हणाला, ‘अशा मुलांना जगण्याचा अधिकार नाही’

On: बुधवार, मार्च 17, 2021 5:06 PM
Harbhajan-Singh
---Advertisement---

भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग हा नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. तो नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपली मते स्पष्टपणे व्यक्त करताना दिसतो. नुकताच त्याने एक व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना राग व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलाने त्याच्या आईला जोरदार कानाखाली मारल्याचे दिसते.

माध्यमांतील वृत्तानुसार दिल्लीतील द्वारका भागातील एका मुलाने ७६ वर्षीय वृद्ध आईला कानाखाली मारल्याचे समोर येत आहे. त्याने मारलेली कानाखाली इतकी जोरदार होती की ती वृद्ध आई खाली पडली तसेच तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवले असता तिला मृत घोषित करण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी तिथे जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी यावर राग व्यक्त केला आहे. यात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने म्हटले आहे की अशा मुलाला जगण्याचा अधिकार नाही. त्याने ट्विट करत दिल्ली पोलिसांकडे आणि मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांच्याकडे कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

हरभजनने ट्विट केले आहे की “आईपेक्षा कोणीही मोठे नसते. कोणताही मुलगा जर आईवर हात उचलत असेल तर तो माणूस असू शकत नाही. हे पाहून फार दु:ख झाले आहे. अशा मुलांना जगण्याचा काही अधिकार नाही. दिल्ली पोलिस आणि अरविंद केजरिवाल या घटनेकडे लक्ष द्या.

केवळ हरभजनच नाही तर माजी भारतीय क्रिकेटपटू रुद्र प्रताप सिंगनेही याबद्दल राग व्यक्त केला आहे. त्याने म्हटले आहे की “आईपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. म्हणूनच भारतातील प्रत्येक धर्मात आईचा दर्जा सर्वात वर आहे. ही घटना पाहून दु:ख झाले.’

https://twitter.com/rpsingh/status/1372067208780677120

ही घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ७६ वर्षीय वृत्त आईचे नाव अवतार कौर असे होते. त्यांची शेजाऱ्यांची भांडणे झाले होती. त्या भांडणाबद्दल मुलगा रणबीरने विचारणा केली. दरम्यान, त्यांच्यातच वाद सुरु झाल आणि रागाच्या भरात रणबीरने अवतार कौर यांना कानाखाली मारली. त्यामुळे खाली पडल्याने अवतार कौर यांना जीव गमवावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या –

गचाळ क्षेत्ररक्षणानंतर शार्दुलवर विराटचा चढला पारा, व्हिडिओ होतोय व्हायरल

धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील कबड्डीपटूंच्या गाडीला मोठा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

‘या’ कारणामुळे कोहलीने आपला क्रमांक ईशान किशनला दिला, फलंदाजी प्रशिक्षकांनी सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---