निवृत्त झालेल्या खेळाडूंसाठी लिजेंड्स क्रिकेट लीग आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी या लीचे दुसरे सत्र आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये अनेक दिग्गजांनी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यातून भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग देखील सुटू शकलेला नाही.
भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग सप्टेंबरमध्ये लिजेंड्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सत्रात क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. त्यांच्याशिवाय भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, युसूफ पठाण, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली, श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आणि विश्वचषक विजेता इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन हे देखील यात खेळणार आहेत.
लीगच्या दुसऱ्या सत्रात चार संघ आणि ११० माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. हरभजन म्हणाला की, “मैदानावर परत आल्याने मी रोमांचित आहे.” दरम्यान, वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू लेंडल सिमन्स आणि दिनेश रामदिन हे देखील आगामी हंगामासाठी खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये दिसले आहेत.
डिसेंबर २०२१ मध्ये निवृत्ती घेतली
बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या हरभजन सिंगने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. सध्या तो आम आदमी पक्षाच्या तिकीटावर राज्यसभेचे खासदार आहे. कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा हरभजन पहिला भारतीय ठरला आहे. २००१च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यात विक्रमी ३२ बळी घेतले होते. हरभजन हा टी२० विश्वचषक (२००७) आणि एकदिवसीय विश्वचषक (२०११) विजेत्या संघाचा सदस्य होता.
१९९८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले
दरम्यान, ४१ वर्षीय हरभजनने भारतासाठी १०३ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि २८ टी२०आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने १९९८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हरभजनने कसोटीत ४१७, एकदिवसीय सामन्यात २६९ आणि टी२० मध्ये २५ बळी घेतले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
महाराष्ट्राचे ‘बुवा’ कबड्डीसाठी आयुष्यभर झटले, त्यांच्या जन्मदिनी साजरा होतोय ‘कबड्डी दिवस’
धोनी अन् रैनाला सोबत पाहून चेन्नईचे चाहते खुश, फोटोवर येतायत भन्नाट रिऍक्शन
‘विराटपेक्षा बाबर कडून जास्त अपेक्षा’, पाकिस्तानच्या खेळाडूने केली दिग्गजांची तुलना