पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला मदत करणे भारतीय संघाचे खेळाडू युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांना महागात पडले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये युवराज आणि हरभजनने आफ्रिदीच्या फाऊंडेशनची मदत केली होती.
तसेच लोकांना आवाहनदेखील केले होते की, त्यांनी आफ्रिदीला (Shahid Afridi) आर्थिक मदत करा. यानंतर लोकांना या दोन्ही खेळाडूंवर चाहत्यांनी निशाना साधला होता. आता पुन्हा युवराज (Yuvraj Singh) आणि हरभजनवर (Harbhajan Singh) चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. खरंतर आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते.
यानंतर आता युवराज आणि हरभजनला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेक चाहत्यांनी तर या दोघांनाही देशाची माफी मागायला सांगितले आहे. एका चाहत्याने लिहिले की, “जर तुम्ही आफ्रिदीसारख्या पाकिस्तानी क्रिकेटपटूचे समर्थन करत असाल तर, टी२० विश्वचषकात सलग ६ षटकार ठोकणे, देशाला विजय मिळवून देणे हे सर्व व्यर्थ आहे.”
यादरम्यान आफ्रिदीच्या विवादात्मक वक्यव्यावर हरभजनने इंडिया टुडेला दिलेल्या खास मुलाखतीत म्हटले की, आम्हाला वाटत होते की, आफ्रिदी आमचा खूप चांगला मित्र आहे. परंतु तो मैत्री करण्यालायक नाही. त्याने आम्हाला मदतीसाठी एक संदेश रेकॉर्ड करण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर आम्हाला खूप शिव्या खाव्या लागल्या होत्या. आम्ही मानवतेचा विचार करून असे केले होते. परंतु मी लोकांना सांगू इच्छितो की, मी भारतात जन्मलो आहे आणि भारतातच मरेल. मी देशासाठी शहीद होण्यास तयार आहे.”
“आफ्रिदीने अपमानजनक कृत्य केले आहे. त्याने आमच्या देशाचे आणि पंतप्रधान मोदींबद्दल चूकीचे वक्तव्य केले आहे. हे सहन करण्याच्या पलीकडचे आहे. त्याने आपली मर्यादा ओलांडली आहे. यानंतर त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. मी संपूर्ण भारताला वचन देतो की, मी पुन्हा त्याची मदत करणार नाही. इतरांचा आदर कसा केला जातो हे आफ्रिदीला शिकावे लागेल,” असेही तो पुढे म्हणाला.
आफ्रिदीने मोदींना भित्रा म्हटले होते. तसेच पाकिस्तानमध्ये त्याने मोदींच्या विचारांना कोरोना व्हायरसपेक्षाही खतरनाक असल्याचे सांगितले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-मोदींवरील विधानाने युवराज भडकला! म्हणाला, माझा त्या खेळाडूशी नाही काहीही संबंध
-भारतीय क्रिकेटपटूचा आफ्रिदीला इशारा, आमचा एक तुमच्या सव्वालाखाबरोबर आहे
-सुनिल गावसकरांचा भारत-पाकिस्तानचा संयुक्त ‘प्लेइंग इलेव्हन’ संघ तुम्ही पाहिलाय का?