---Advertisement---

बापाची आठवण! पंड्या ब्रदर्सने सामन्यापुर्वी वडिलांच्या ‘या’ तीन गोष्टी नेल्या होत्या ड्रेसिंगरुममध्ये

On: बुधवार, मार्च 24, 2021 2:51 PM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील काल खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्या यांनी पदार्पण केले. यातील कृणाल पंड्यासाठी हा सामना अतिशय भावुक ठरला.
कृणाल पंड्याच्या वडिलांचे यावर्षी जानेवारी महिन्यात निधन झाले होते. त्यानंतर दोन महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या कृणालने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकवले आणि आपल्या दिवंगत वडिलांना ते अर्पण केले.

हार्दिक देखील झाला होता भावूक
या सामन्यात कृणालसह त्याचा भाऊ हार्दिक पंड्या देखील भारताकडून खेळत होता. तो देखील यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कृणालने अर्धशतक झळकवल्यावर आभाळाकडे पाहत आपल्या वडिलांना अभिवादन केले. यानंतर डग आउटमध्ये बसलेल्या हार्दिकच्याही डोळ्यांत पाणी आले. त्याच्या बाजूला बसलेल्या सूर्यकुमार यादवने त्यावेळी त्याला धीर दिल्याचे दिसून आले.

वडिलांच्या ३ गोष्टी ठेवल्या होत्या ड्रेसिंग रूममध्ये
हार्दिक आणि कृणाल पंड्या यांनी आपल्या वडिलांच्या तीन खास गोष्टी आपल्यासोबत या सामन्यात ड्रेसिंग रूममध्ये नेल्या होत्या. यात वडिलांचे शूज, टोपी आणि कपड्यांचा समावेश होता. याद्वारे आपल्या वडिलांचे आभासी अस्तित्व आपल्याजवळ असावे, असा त्यांचा प्रयत्न होता.

कृणालने गाजवले पदार्पण
दरम्यान, कृणाल पंड्यासाठी हा सामना भावनिक दृष्ट्या कठीण असला तरी त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने आक्रमक अर्धशतक झळकवत भारताची धावसंख्या ३१७ पर्यंत पोहोचवली. पदार्पणाच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर येऊन अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्यानंतर दुसर्‍या डावात त्याने एक बळी मिळवला. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीचा भारताच्या विजयात मोलाचा वाटा होता.

महत्वाच्या बातम्या:

तयारी आयपीएलची! किंग खानच्या केकेआरचे हे दोन परदेशी शिलेदार भारतात दाखल, पाहा फोटो

नादच खुळा! १७ वर्षीय शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक; केली भारताकडून तिसर्‍या वेगवान टी२० अर्धशतकाची नोंद

भारीच ना! अवघ्या २ धावांनी हुकले शतक, पण सामन्यानंतर धवनने आपल्या शब्दांनी जिंकले चाहत्यांचे मन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---