इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ हंगामाचा सांगता झाली आहे. यंदाच्या हंगामात नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाने यंदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले आहे. यावेळी गुजरातचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याने संपूर्ण हंगामात विशेष कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवला.
आयपीएल २०२२ पूर्वी (IPL 2022) हार्दिक पंड्या (Hardik Pandya) दुखापतग्रस्त असल्याने ही आयपीएल त्याच्यासाठी पुनरागमनाची संधी होती. त्यामुळे प्रत्येकाची नजर विशेषत: हार्दिकवर होती. आता आयपीएल चषक जिंकत हार्दिकने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
हार्दिक जखमी झाल्यावर त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने त्याचे मनोब वाढवले होते. आता हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले, तेव्हा नताशा खूपच भावूक दिसत होती. नताशा आणि हार्दिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुजरात टायटन्स चॅम्पियन होताच नताशाही मैदानात आली होती. तिने पती हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) मिठी मारली. यावेळी नताशा भावूक दिसली. मात्र, नंतर हार्दिक तिचे सांत्वन करताना दिसला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला १३० धावांवर रोखले. यानंतर त्यांनी ७ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. यासह हार्दिकने इतिहास रचला आहे. त्याने पहिल्याच हंगामात संघाला चषक जिंकवून देण्याच्या विक्रमात राजस्थानचा माजी कर्णधार दिवंगत शेन वॉर्नची (Shane Warne) बरोबरी केली आहे.
https://twitter.com/Ashok94540994/status/1530978490887319552?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1530978490887319552%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-watch-viral-video-natasa-stankovic-gets-emotional-after-meeting-husband-hardik-pandya-post-gt-win-ipl-title-4286714.html
आयपीएल २०२२ हा हार्दिक पांड्यासाठी पुनरागमनाचा हंगाम ठरला आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात गोलंदाजी न केल्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. टी २० विश्वचषकानंतर तो एकही सामना न खेळता आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आला होता. त्याच्या तंदुरुस्तीबद्दल शंका होत्या. पण या सर्व गोष्टींना मागे टाकत हार्दिकने आयपीएलच्या या हंगामात फलंदाजीसोबतच शानदार गोलंदाजी केली. अंतिम सामन्यामध्ये त्याने ३ महत्त्वाच्या विकेट घेतल्या. अंतिम सामन्यामधील त्याची ही कामगिरी गुजरातसाठी निर्णायक ठरली. त्याच्या गोलंदाजीमधील ३ विकेट्स आणि फलंदाजीमधील ३४ धावांमुळे त्याला सामनावीर ठरवण्यात आले.
दरम्यान, हार्दिकने अंतिम सामन्यात गोलंदाजीमध्ये आपली चमक दाखवत ४ षटकांत केवळ १७ धावा देत ३ बळी घेतले. यामध्ये जोस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांचा समावेश आहे. हार्दिक आयपीएल अंतिम सामन्यामध्ये विकेट घेणारा केवळ दुसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना डेक्कन चार्जर्स विरुद्ध १६ धावा देत ४ बळी घेतले होते.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
IPL 2022 I ट्रॉफी विजयाचं सुख नाही पण ‘हे’ सुख मात्र राजस्थानच्या वाट्याला नक्कीच आलंय
बटलरने ९७३ धावांचा विक्रम मोडला नाही, पण ‘या’ पराक्रमात विराटला मागे टाकलेच