---Advertisement---

पंड्या बंधू ठरत आहेत मुंबई इंडियन्ससाठी ओझे? पाहा या हंगामातील चकित करणारी आकडेवारी

On: शनिवार, एप्रिल 24, 2021 8:00 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्सला कालच्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पंजाबने मुंबईचा ९ विकेट्सने पराभव केला. हा मुंबईचा यंदाच्या हंगामातील पाच सामन्यातील तिसरा पराभव ठरला. त्यामुळे आता बाद फेरी गाठण्याचा मार्ग मुंबईसाठी काहीसा खडतर होतो आहे.

मुंबईकडून काही खेळाडू यंदाच्या पाचही सामन्यात सातत्याने अपयशी ठरत आहेत. विशेषतः काही फलंदाजांची कामगिरी मुंबईच्या चिंतेत भर घालणारी आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या संघातील स्थानावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यातील मुख्य नावे म्हणजे हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या.

पंड्या बंधूंची निराशाजनक कामगिरी
हार्दिक आणि कृणाल या पंड्या बंधूंनी मागील काही हंगामांपासून मुंबई इंडियन्स साठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र यंदाच्या हंगामात या दोघांचेही प्रदर्शन लौकिकाला साजेसे झाले नाहिये. या हंगामात आत्तापर्यंत खेळवल्या गेलेल्या पाचही सामन्यात हे दोघेही अपयशी ठरले आहेत.

हार्दिक पंड्या बाबत बोलायचे झाल्यास तो सध्यातरी दुखापतीमुळे गोलंदाजी करत नाहिये. त्यामुळे फक्त फलंदाज म्हणून तो सध्या संघात आहे. आणि फलंदाज म्हणून त्याची कामगिरी यंदा यथातथाच राहिली आहे. त्याने यावेळी खेळलेल्या ५ सामन्यात केवळ ३६ धावा केल्या आहेत. यात त्याची सरासरी अवघी ७.२० होती तर त्याची सर्वोच्च धावसंख्या १५ इतकी होती. तसेच त्याने केवळ ५ चौकार मारले आहेत.

दुसरीकडे कृणाल पंड्या बाबत बोलायचे झाल्यास त्याचीही कामगिरी साधारणच होती. कृणालने ५ सामन्यात ७.२५च्या सरासरीने २९ धावा केल्या आहेत. त्याचीही यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या केवळ १५ अशी आहे. गोलंदाजीत देखील त्याने फार खास कामगिरी केली नाहिये.

खरंतर पंड्या बंधू मुंबई इंडियन्ससाठी मॅच विनर समजले जातात. मात्र यंदाच्या हंगामात त्यांना सातत्याने अपयश येत असल्याने त्यांच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच संघाकडे जेम्स नीशम सारख्या गुणी अष्टपैलू खेळाडूंचा पर्याय उपलब्ध असल्याने पंड्या बंधूंवरील दबाव अजूनच वाढला आहे. आता आगामी सामन्यात मुंबई इंडियन्स त्यांना संघात कायम ठेवणार का आणि तसे झाल्यास पंड्या बंधू आपला फॉर्म परत मिळवणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

महत्वाच्या बातम्या:

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत होणाऱ्या आयपीएल सामन्यांविषयी आली महत्त्वाची अपडेट, वाचा सविस्तर

जिंकलस भावा! वाढदिवसाच्या दिवशी सचिनने केला खास संकल्प करत दिला स्तुत्य सामाजिक संदेश, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ : मुंबईला धूळ चारल्याने गेल आनंदी, म्हणतोय मोगॅम्बो खुश हुआ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---