केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आयपीएल मधील बलाढ्य संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला कालच्या सामन्यात धूळ चारली. चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्जने तीनही आघाड्यांवर सरस खेळ करत मुंबईला ९ विकेट्सने मात दिली.
या विजयानंतर पंजाब किंग्जच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. विशेषतः स्फोटक फलंदाज ख्रिस गेल या विजयानंतर चांगलाच खुश झालेला दिसला. त्याचा आनंद साजरा करतांनाचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे.
“मोगॅम्बो खुश हुआ”
मुंबई इंडियन्स विरूद्धच्या विजयात ख्रिस गेलने देखील मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात ३५ चेंडूत नाबाद ४३ धावांची खेळी केली. यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. केएल राहुल आणि गेलने दुसऱ्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी करत पंजाबला विजयी लक्ष्य गाठून दिले. गेल्या काही सामन्यात अपयशी ठरत असलेल्या गेलने या खेळीद्वारे फॉर्मात परत येनायचे देखील संकेत दिले.
सामन्यानंतर गेल भलताच खुश असल्याचेही दिसून आले. संघासह मैदानात व्यायाम करत असतांना कॅमेरा त्याच्या समोर आला. त्यावेळी त्याने ‘मिस्टर इंडिया’ या प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील ‘मोगॅम्बो खुश हुआ’ हा डायलॉग म्हंटला. पहिल्यांदा त्याच्या उच्चारात काहीशी गल्लत झाली, मात्र एका खेळाडूने त्याला योग्य उच्चार सांगितल्यावर दुसर्या प्रयत्नात त्याने अचूक डायलॉग म्हणून दाखवला. पंजाब किंग्जच्या संघाने आपल्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
पंजाबचा यंदाच्या हंगामातील दुसरा विजय
दरम्यान, पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सला मात देत यंदाच्या हंगामातील केवळ दुसरा विजय नोंदवला. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्या नंतर सलग तीन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र कालच्या सामन्याने ते विजयपथावर परतले आहेत. हाच सिलसिला उर्वरित हंगामासाठी कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
महत्वाच्या बातम्या:
आणि सचिनला अमिताभ बच्चन यांच्यासमोर व्हावे लागले होते खजील, वाचा तो मजेदार किस्सा






