Hardik Pandya – Natasha Stankovic : भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि सर्बियन मॉडल नताशा स्टॅनकोविक यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. दोघांनी संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून ते मुलगा अगस्त्यचा सहपालक बनून सांभाळ करणार आहेत. असे असले तरीही, नताशाच्या एका रहस्यमयी पोस्टमुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
हार्दिकसोबत घटस्फोटाच्या निर्णयाच्या एक दिवस आधी नताशा मुलगा अगस्त्यसोबत सर्बियाला निघून गेली आहे. तेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत अगस्त्यसोबत चांगला वेळ घालवतानाचे फोटो पोस्ट करत आहे, ज्यामध्ये नताशा आपल्या मुलाला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दुसरीकडे, हार्दिक सध्या श्रीलंकेत टी20 मालिका खेळण्याच्या तयारीत व्यस्त आहे.
हार्दिक आणि नताशा यांनी एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु आता मुलगा अगस्त्यचे काय होणार? हा मोठा प्रश्न आहे. घटस्फोट म्हणजे काय हे देखील माहीत नसलेल्या चार वर्षांचा मुलगा कोणासोबत राहणार? या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर नताशाने शुक्रवारी (26 जुलै) तिच्या इन्स्टाग्रामवर एक रहस्यमय पोस्ट केली, ज्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
नताशाने पालकत्वाचा संदर्भ देत लिहिले, “हे जग कठोर आहे म्हणून तुमच्या मुलाशी कठोर होण्याची गरज नाही. याचा अर्थ प्रेम कठोर नाही तर नशीब कठोर आहे. जेव्हा मुले तुमच्या पोटी जन्माला आली, तेव्हाच तुम्ही मुलाचे संपूर्ण जग बनलाय, ही गोष्ट खरी आहे. आणि ते तुमचेच आहेत प्रेम करण्यासाठी…”
घटस्फोटानंतर नताशा सर्बियामध्ये आपला मुलगा अगस्त्याची चांगली काळजी घेत आहे. तिची ही पोस्ट माजी पती हार्दिकला टोमणा म्हणून पाहिली जात आहे. हार्दिकला आपल्या मुलाची काळजी नाही का? अगस्त्यला त्याच्यासोबत राहायचे नाही का? हार्दिकला आता एकटे राहायचे आहे का? नताशाच्या या रहस्यमय पोस्टनंतर हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माचा विसरभोळेपणा, सामानाच्या बॅगा किती आणल्या हेच विसरला!; VIDEO व्हायरल
हार्दिक पांड्या इतिहास रचण्याच्या जवळ! अशी कामगिरी करणारा बनेल पहिलाच भारतीय
Asia Cup Final; फायनलमध्ये भारतापुढे श्रीलंकेचं आव्हान, भारत-श्रीलंका कोणाचं पारडं जड?