भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला खुशखबर मिळाली आहे. तो बाबा झाला आहे. त्याची पार्टनर नताशा स्टॅन्कोव्हिकने मुलाला जन्म दिला आहे. याबद्दल हार्दिकने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
त्याने बाळाचा हात हातात घेतलेला फोटो शेअर केला असून त्या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘आम्हाला मुलगा झाला आहे.’
हार्दिकच्या या पोस्टवर अनेक क्षेत्रातील सेलिब्रेटिंनी आणि चाहत्यांनी प्रतिक्रिया देत शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संघातील कर्णधार विराट कोहली, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केएल राहुल असे अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
https://twitter.com/hardikpandya7/status/1288778836872634368
काही दिवसांपूर्वीच ३१ मेला हार्दिक आणि नताशाने ते दोघे आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी नताशाच्या बेबी शॉवरचे फोटोही शेअर केले होते.
हार्दिकने या वर्षाच्या सुरुवातीला नताशाबरोबर साखऱपुडा केला होता. त्याने नव्या वर्षी फिल्मी स्टाईलमध्ये नताशाला अंगठी घालत समुद्रामध्ये बोटीत साखरपुडा केला होता. २७ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री आणि डांसर नताशा सर्बियामध्ये राहणारी आहे. नताशा नच बलिए टी.व्ही. शोमध्येही दिसली आहे.
https://www.instagram.com/p/B6xrw7WlubB/
२६ वर्षीय हार्दिक पंड्या भारताकडून खेळताना ११ कसोटी सामन्यात ५३२ धावा केल्या तर ५४ वनडेत सामन्यात ९५७ धावा केल्या आहेत. ४० टी२० मध्ये ३१० धावा त्याच्या नावावर आहेत. यासोबतच गोलंदाजीत कसोटीत १७, वनडेत ५४, आणि टी२०मध्ये ३८ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
शेन वॉर्न म्हणतो, ‘हा’ खेळाडू करिअरच्या शेवटपर्यंत घेईल ७०० कसोटी विकेट्स
चाहत्याने घेतली क्रिकेटर बरोबर सेल्फी: नंतर कळाले हा तर आहे कोरोना पॉझिटिव्ह
फक्त या खेळाडूमुळे, नाहीतर पाकिस्तान जिंकला असता एकूण ४ विश्वचषक
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-२ फलंदाज, ज्यांनी धोनी, विराट आणि रोहितलाही टाकलयं मागं
या ५ दिग्गज परदेशी खेळाडूंना आयपीएल २०२० दरम्यान क्वचितच मिळेल खेळण्याची संधी…






