भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिका 12 जुलै रोजी सुरू होणार आहे. हार्दिक पंड्या कसोटी संघाचा भाग नसल्यामुळे तो अद्याप वेस्ट इंडीजसाठी रवाना झाला नाहीये. मात्र, वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत कर्णधाराची भूमिका पार पाडणारा आहे. तत्पूर्वी हार्दिक दुलीप ट्रॉफी 2023च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी मैदानात उपस्थित होता. त्याच्यासोबत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत देखील या सामन्याचा आनंद घेताना दिसला.
नॉर्थ झोन आणि साउथ झोन यांच्यात दुलीप ट्रॉफी 2023चा हा दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. साउथ झोनने या सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात जागा पक्की केली. आता बुधवारी (12 जुलै) या सामन्याचा अंतिम सामना साउथ झोन आणि वेस्ट झोन यांच्यात खेळला जाणार आहे. बेंगलोरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसरा उपांत्य सामना पाहण्यासाठी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) उपस्थित होताच, पण त्याच्यासोबत रिषभ पंत (Rishabh Pant) दिसल्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
डिसेंबर 2022च्या शेवटच्या आठवड्यात रिषभ पंतचा भीषण कार अपघात झाला होता. अपघातात पंतची गाडी जळून खाक झाली. पण सुदैवाने भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आधीच गाडीतून बाहेर पडला होता. अपघातात पंदला जबर मार लागला असून अनेक ठिकाणी फ्रँक्चर देखील झाले होते. सध्या पंत बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब करत आहे. यादरम्यानच बेंगलोरमध्ये खेलल्या जात असलेल्या या दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यासाठी त्याने हार्दिक पंड्यासोबत हजेरी लावल्याचे दिसते. दोघांचे पोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर पाहायला मिळत आहेत.
Rishabh Pant & Hardik Pandya were watching Duleep Trophy Semi.
.
.
📸 The Hindu
.
.#DuldeepTrophy #Rishabpant #hardikPandya pic.twitter.com/sVEW7ubxuh— Cricket Apna l Indian cricket l Bleed Blue 💙🇮🇳 (@cricketapna1) July 8, 2023
https://twitter.com/Prisha__Kaur/status/1677728039139172352?s=20
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिका 3 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. मालिकेत एकून 5 सामने खेळले जाणार असून शेवटचा सामना 13 ऑगस्ट रोजी शेवटचा सामना खेळला जाईल. तत्पूर्वी उभय संघात 2 सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. कसोटी आणि वनडे मालिकेत रहोत शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसले. (Hardik Pandya and Rishabh Pant entered the field for Duleep Trophy semi-final)
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा टी-20 संघ: ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव (उपकर्णधार), संजू सैमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, अवेश खान, मुकेश कुमार.
महत्वाच्या बातम्या –
ट्रेविस हेडची महत्वपूर्ण खेळी! ऍशेसमध्ये आव्हान टिकवण्यासाठी इंग्लंडला 251 धावांचे लक्ष्य
IND vs WI : पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया डॉमिनिकासाठी रवाना, ब्लॅक जर्सीत दिसले खेळाडू; Photos