हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर टी20 मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-0 असा पुढे आहे. वानखेडे स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने शेवटच्या चेंडूवर 2 धावांनी रोमांचक विजय मिळवला होता. दुसरा सामना गुरूवारी (5 जानेवारी) पुण्यात खेळला जाणार असून पंड्याची नजर मालिका जिंकण्यावर असणार आहे.
आयपीएल 2022च्या हंगामाआधी हार्दिक पंड्या (Hardik Pandya)याच्या फिटनेसवर प्रश्न निर्माण झाले होते. तो 2021च्या टी20 विश्वचषकातही संपुर्णपणे फिट नव्हता. यामुळे त्याला केवळ फलंदाजीच करता आली होती. त्यानंतर तो 6 महिने तरी संघाबाहेर राहिला. त्याने 2022च्या आयपीएलमध्ये क्रिकेटमध्ये परतत गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना अष्टपैलू खेळी केली.
आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करताना हार्दिकने गुजरातला पदार्पणातच विजेतेपद जिंकून दिले. त्यानंतर त्याच्याकडे भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहू लागले. त्याने आयर्लंडच्या दौऱ्यात सर्वप्रथम भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली. त्या टी20 मालिकेत भारत 2-0 असा जिंकला. नंतर त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यात एका सामन्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तोही सामना भारताने जिंकला.
तसेच 2022च्या टी20 विश्वचषकानंतर भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला. तेथे भारत हार्दिकच्या नेतृत्वाखाली टी20 मालिका 1-0 असा जिंकला. आता श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी20 सामना जिंकत भारताचे मालिका जिंकण्यावर लक्ष असणार आहे. यामुळे हार्दिक आर्यंलड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या संघाविरुद्धच्या टी20 मालिका विजयाच महत्वाची भुमिका निभावली आहे. यानंतर आता तो श्रीलंका या चौथ्या संघाला पराभूत करण्याच्या तयारीत आहे.
हार्दिकने आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्यातील एकही सामना भारताने गमावला नाही. 6 मधील 5 सामने भारताने जिंकले, तर एका सामना बरोबरीत सुटला. त्याने खेळाडू म्हणून 82 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 26च्या सरासरीने 1189 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 62 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच त्याने भारताने नेतृत्व करताना 6 टी20 सामन्यात 137 धावा करताना एक विकेटही घेतली आहे.
(Hardik Pandya as a Indian Captain Record INDvSL 2nd T20)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिडनीमध्ये कसोटीत लागोपाठ तीन शतके करणारा ख्वाजा केवळ चौथाच खेळाडू, यादीत एका भारतीयाचाही समावेश
पुण्यातही भारत-श्रीलंका यांच्यात पाहायला मिळणार काट्याची टक्कर! मागील सामन्यांचे निकालच धक्कादायक