---Advertisement---

हार्दिक पंड्या पुन्हा बनला भारताचा कर्णधार, स्वतः बीसीसीआयने सोपवलीये जबाबदारी

On: सोमवार, ऑक्टोबर 31, 2022 7:47 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ जबरदस्त प्रदर्शन करत आहे. सुपर 12 च्या ग्रुप दोनमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. संघाचे विजयी घोडदौड सुरू असतानाच बीसीसीआयने सोमवार, 31 ऑक्टोबर रोजी आगामी दौऱ्यांसाठी संघाची घोषणा केली. भारताला नोव्हेंबर महिन्यात तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौरा करायचा आहे. तर डिसेंबर महिन्यात संघ बांगलादेश दौरा करेल. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत अष्टपैलू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-20 विश्वचषकानंतर संघासोबत न्यूझीलंड दौरा करणार नाहीत.  या दोघांना विश्रांती दिल्यामुळे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पंड्या (hardik Pandya) याच्या खांद्यावर पडली आहे. भारतीय संघाचा नियमित उपकर्णधार केएल राहुल देखील न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही मालिका खेळणार नाहीये. राहुल टी-20 विश्वचषकात अद्याप अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. चाहते त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर राहुल चांगल्या फॉर्ममध्ये पुनरागमन करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा 18 नोव्हेंबरपासून सुरू होईल. उभय संघांमध्ये सुरुवातीला तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. याच मालिकेत हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. याआधी हार्दिकने टी-20 विश्वचषक 2022 पूर्वी आयर्लंड दौऱ्यात देखील भारताच्या कर्णधाराची भूमिका पार पाडली होती. या दौऱ्यातील दोन्ही टी-20 सामने भारातने हार्दिकच्या नेतृत्वात जिंकले होते. आता संघा पुन्हा एकदा त्याच्या नेतृत्वात टी-20 मालिका खेळणार आहे. परंतु यावेळी आव्हान सोपे नसेल. न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वत्तम संघांपैकी एक आहे. अशात त्यांच्याच मायदेशात जाऊन विजय मालिका जिंकने भारतासाठी नक्कीच सोपे नसेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ –
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार / यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ – 
शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार / यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), डब्ल्यू सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, यश दयाल

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्या पुन्हा बनला भारताचा कर्णधार, स्वतः बीसीसीआयने सोपवलीये जबाबदारी
ब्रेकिंग! न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीकडून एकूण चार संघांची घोषणा 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---