वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला गेला. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभव झाला आणि मालिका वेस्ट इंडीजने नावावर केली. भारतीय संघाच्या या पराभवामुळे कर्णधार हार्दिक पंड्याच्या नावे काही नकोसे विक्रम जमा झाले.
या निर्णायक सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकली होती. मात्र, कर्णधाराने घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय फसल्याचे दिसले. प्रथम फलंदाजी करताना भारतासाठी केवळ सूर्यकुमार यादव अर्धशतक करू शकला. सूर्यकुमारने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 45 चेंडूत 61 धावांची खेळी केली. निर्धारित 20 षटकांमध्ये भारतीय संघ 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने हे लक्ष्य 8 गडी राखून गाठले. सलामीवीर ब्रँडन किंग याने 55 चेंडूत 85 धावांची मॅचविनिंग खेळी केली.
या पराभवासह हार्दिक पंड्या हा 17 वर्षानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध तीन पेक्षा जास्त सामन्यांची टी20 मालिका गमावणारा पहिला कर्णधार बनला. यासोबतच एका द्विपक्षीय टी20 मालिकेत तीन सामने गमावणारा तो भारताचा पहिला कर्णधार बनला. तर मागील 25 महिन्यात भारताचा हा पहिला टी20 मालिका पराभव आहे.
हार्दिक याच्याकडे मागील वर्षी आयपीएलमध्ये गुजरात संघाचे नेतृत्व देण्यात आलेले. पहिल्याच प्रयत्नात त्याने संघाला विजेते बनवण्यात यश मिळवले. त्यानंतर तो आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचा कर्णधार बनला. टी20 विश्वचषकातील भारताच्या पराभवानंतर तो सातत्याने भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. पुढील वेस्ट इंडीज व अमेरिकेतच होणाऱ्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ त्याच्याच नेतृत्वात खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
(Hardik Pandya Become First Captain Who Lost T20 Series Against West Indies After 17 Years)
महत्वाच्या बातम्या –
आकडे बोलतायेत! 2021 पासून भारतीय संघाने अभिमान करावा अशी कामगिरी केलीच नाही
वेस्ट इंडीज दौऱ्यावर संजू पूर्णपणे फ्लॉप! खराब कामगिरीने पुन्हा आला चाहत्यांच्या निशाण्यावर