पल्लेकेल: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आज खणखणीत शतक करत अनेक विक्रम आपल्या नावे केले. असंख्य विक्रमांची बरोबरी करताना अनेक विक्रम मोडलेही.
परंतु त्यातील सर्वात खास विक्रम म्हणजे त्याने भारताचे महान अष्टपैलू खेळाडू आणि विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांचा विक्रम. हा असा एक विक्रम आहे जो ऐकूनहार्दिक पंड्यालाही आनंद होईल.
एका षटकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू होण्याचा मान आता हार्दिक पंड्याच्या नावावर झाला आहे. त्याने पुष्पाकुमाराच्या एकाच षटकात तब्बल २६ धावा केल्या आहेत. यात त्याने ३ षटकार आणि २ चौकार मारले आहेत.
यापूर्वी हा विक्रम भारताकडून कपिल देव आणि संदीप पाटील यांच्या नावावर होता. त्यांनी एका षटकात २४ धावा केल्या होत्या.
कसोटीत एकाच षटकांत सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
२६ हार्दिक पंड्या वि श्रीलंका, २०१७
२४ संदीप पाटील वि इंग्लंड, १९८२
२४ कपिल देव वि इंग्लंड, १९९०
कसोटीत एकाच षटकांत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
२८- ब्रायन लारा
२८- जॉर्ज बेली
२७- शाहिद आफ्रिदी
२६- हार्दिक पांड्या