आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात डब्लिन येथे रविवारी (२६ जून) २ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. पाहुण्या भारतीय संघाने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्यासाठी हा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याचा पहिलाच सामना होता. या सामन्यात त्याने संघाचे नेतृत्त्व करण्याबरोबरच आपला अष्टपैलू खेळही दाखवला. दरम्यान त्याने एक विकेट घेत मोठी कमाल केली आहे.
या सामन्यात (IRE vs IND) नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी निवडली होती. परिणामी आयर्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी आला होता. पावसाच्या व्यत्ययानंतर सामना २० षटकांपासून १२ षटकांपर्यंत घटवण्यात आला. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना १२ षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १०८ धावा केल्या.
या डावादरम्यान २ षटके गोलंदाजी करताना २६ धावा खर्च करत कर्णधार हार्दिकने (Captain Hardik Pandya) १ विकेट घेतली. आयर्लंडचा सलामीवीर पॉल स्टर्लिंग (Paul Stirling) याला पंड्याने डावातील दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दीपक हुड्डाच्या हाती झेल देत बाद केले. स्टर्लिंग वैयक्तिक ४ धावांवर झेलबाद झाला. अशाप्रकारे मोठी विकेट घेत हार्दिक आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये विकेट घेणारा पहिला (Wicket In T20I) आणि एकमेव भारतीय कर्णधार (First Indian Captain) बनला आहे. हार्दिकपूर्वी ८ वेगवेगळे कर्णधार होऊन गेले, परंतु त्यांना ही कामगिरी करता आली नव्हती.
हार्दिकपूर्वी विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि रिषभ पंत असे ८ कर्णधार भारताच्या टी२० संघाला लाभले आहेत. परंतु त्यापैकी कोणीही संघाचे नेतृत्त्व करताना विरोधी संघातील विकेट घेऊ शकला नव्हता.
असे असले तरीही, वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी भारतीय कर्णधारांनी विकेट काढल्या आहेत. अगदी मागील ६ अशा घटनांबद्दल बोलाायचे झाल्यास, सुरेश रैनाने (२०१४, २०११) २ वेळा कर्णधार असताना विकेट घेतल्या आहेत. तर विरेंद्र सेहवागनेही २ फलंदाजांना आपली शिकार बनवले होते. २००९ आणि २०१० मध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना त्याने असे केले होते. तसेच धोनीने वनडे क्रिकेटमध्ये २००९ मध्ये एकमेव विकेट घेतली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची विजयी सलामी! आयर्लंडला हरवत मालिकेत 1-0 ने आघाडी
मुंबईचे ४२ व्या रणजी ट्रॉफीचं स्वप्न चकणाचूर, ‘या’ पाच खेळाडूंनी नाही केले अपेक्षित प्रदर्शन
हार्दिकच्या नेतृत्वातील पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा, थोड्याच वेळात मॅच सुरू होण्याचे संकेत