---Advertisement---

मुंबईचे ४२ व्या रणजी ट्रॉफीचं स्वप्न चकणाचूर, ‘या’ पाच खेळाडूंनी नाही केले अपेक्षित प्रदर्शन

On: रविवार, जून 26, 2022 11:04 PM
Mumbai-Ranji-Team
---Advertisement---

मुंबई संघ यावर्षी रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावू शकला नाही. बेंगलोरमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने ६ विकेट्स राखून मुंबईवर मात केली. मध्य प्रदेशला शेवटच्या डावात विजयासाठी अवघ्या १०८ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी ४ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. मध्य प्रदेशसाठी यश दुबे, रजत पटीदार आणि शुभम शर्मा यांनी महत्वपूर्ण प्रदर्शन केले. पण मुंबईसाठी असे प्रदर्शन एकही खेळाडू करू शकला नाही. आपण या लेखात अशा पाच बाबींवर नजर टाकणार आहोत, ज्याठिकाणी मुंबईचे खेळाडू अधिक चांगले प्रदर्शन करू शकत होते.

मुंबईचे हे पाच खेळाडू करू शकत होते अधिक चांगले प्रदर्शन

पृथ्वी शॉ – 
मुंबई संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ यावर्षी रणजी ट्रॉफीत त्याच्या प्रतिभेनुसार खेळू शकला नाही. त्याने या हंगामातील ६ सामन्यांमध्ये १० वेळा फलंदाजी केली आणि यामध्ये ३५.५० च्या सरासरीने ३५५ धावा केल्या. यामध्ये त्याला एकही शतक करता आले नाही. मुंबईचा सलामीवीर असल्यामुळे त्याच्याकडून संघाला अधिक चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती. अंतिम सामन्यात शॉने ४७ आणि ४४ अशा धावा केल्या. अंतिम सामन्यात शॉकडून चाहत्यांची अपेक्षा आणि संघाची गरज मात्र या प्रदर्शापेक्षा खूप जास्त होती.

अरमान जाफर – 
मुंबईचा मध्यक्रमातील फलंदाज अरमान जाफरनेही काही खास प्रदर्शन केले नाही. अंतिम सामन्यात त्याच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या गेल्या होत्या, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. पहिल्या डावात २६ आणि दुसऱ्या डावात ३७ धावा करून तो बाद झाला. चालू हंगामात त्याने मुंबईसाठी २ शतक आणि १ अर्धशतक ठोकले होते, आणि एकूण ४०२ धावा केल्या. असे असले तरी शेवटच्या सामन्यात तो कमाल दाखवू शकला नाही.

सुवेद पारकर – 
सुवेद पारकरने अंतिम सामन्याच्या आधी मुंबई संघासाठी चांगले प्रदर्शन केले होते. संपूर्ण हंगामात त्याने मुंबईसाठी महत्वाचे योगदान दिले, पण अंतिम सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. पहिल्या डावात त्याने १८, तर दुसऱ्या डावात ५१ धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने चांगली सुरुवात केली होती, पण शतक करू शकला असता, तर संघाला त्याचा नक्कीच खूप फायदा मिळाला असता.

धवल कुलकर्णी – 
मंबई संघाला अंतिम सामन्यात वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीकडून देखील खूप अपेक्षा होत्या. पण या महत्वाच्या सामन्यात धवलला सुरू गवसला नाही. सामन्यातील दोन्ही डावांमध्ये मिळून त्याने फक्त एक विकेट घेतली. पहिल्या डावात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती, पण दुसऱ्या डावात एक यश नक्कीच मिळाले. रणजी ट्रॉफीच्या संपूर्ण हंगामात त्याने एकूण १३ खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला आहे.

मोहित अवस्थी – 
वेगवान गोलंदाज मोहित अवस्थी देखील अंतिम सामन्यात मुंबईसाठी अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. पहिल्या डावात त्याने २ विकेट्स घेतल्या, पण दुसऱ्या डावात त्याला यश मिळाले नाही. अंतिम सामन्यात त्याने अधिक विकेट्स घेतल्या नाहीत, हे मुंबईच्या पराजयाचे प्रमुख कारण ठरले आहे. यावर्षी त्याने मुंबईसाठी एकूण १६ विकेट्स घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

कोरोनावर मात केल्यानंर इंग्लंडचा घाम काढणार आर अश्विन, सराव सामन्यासाठी झाला उपस्थित

‘रोहित नसला तर विराटला करा कॅप्टन’, ट्वीटरवर चाहत्यांची एकसुरात मागणी

‘मी सांगतोय ना, उमरानला टी२० विश्वचषकात घ्या’, भारताच्या माजी कर्णधाराचे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---