ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूष क्रिकेट संघाच्या आठव्या टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup)थरार सुरू आहे. ही स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून गुरूवारी (10 नोव्हेंबर) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा उपांंत्य सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. त्यामध्ये विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी अर्धशतकी खेळी केल्या. त्यामुळे भारताने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 168 धावसंख्या उभारली. यावेळी हार्दिकने मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव हे उत्तम खेळतील अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा विराट कोहली (Virat Kohli) याने बाजी मारली. रोहित-राहुल बाद झाल्यावर विराटने डाव सांभाळत 40 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला सोबतीला घेत चौथ्या विकेटसाठी 40 चेंडूत 61 धावा केल्या. या सामन्यात हार्दिकने त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक केले, तर टी20 विश्वचषकातील त्याचे हे पहिलेच अर्धशतक ठरले आहे. त्याचबरोबर तो टी20 विश्वचषकाच्या बाद फेरीत पहिले अर्धशतक करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने 33 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या. त्याचबरोबर तो पाचव्या किंवा त्याही खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत बाद फेरीच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्याआधी हा विक्रम युवराज सिंग याच्या नावावर होता. त्यानेही इंग्लंडविरुद्धच 2007मध्ये 58 धावा केल्या होत्या. तसेच हार्दिकची ही आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. त्याने पहिली खेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध याचवर्षी केली होती. मोहाली येथे झालेल्या सामन्यात त्याने नाबाद 71 धावा केल्या होत्या. Hardik Pandya becomes the first Indian whose maiden T20 World Cup fifty is in a knockout match
A terrific half-century from Hardik Pandya helps India set a target of 169 💪#INDvENG | 📝: https://t.co/PgKzpNrdvB
Head to our app and website to follow the #T20WorldCup action 👉 https://t.co/76r3b73roq pic.twitter.com/zTbSeCN9Dp
— ICC (@ICC) November 10, 2022
विशेष म्हणजे हार्दिकने या तिन्ही अर्धशतकी खेळ्या याचवर्षी केल्या आहेत. तसेच त्याने पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक इंग्लंडविरुद्धच केले होते. त्याने यावर्षी आतापर्यंत 25 सामने खेळताना 33.17 च्या सरासरीने 564 धावा केल्या आहेत. यासाठी त्याने 44 चौकार आणि 29 षटकार मारले आहेत. यावरूनच फलंदाजीमध्ये हार्दिकसाठी 2022 विलक्षण ठरत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’ने टी20 विश्वचषक 2022मध्ये केली खराब कामगिरी, एक अर्धशतक सोडले, तर सगळीकडे ठरलाय फ्लॉप
विराट-हार्दिकच्या झंझावाताने टीम इंडियाचे कमबॅक! फायनलसाठी इंग्लंडसमोर 169 धावांचे आव्हान