विश्वविजेता भारतीय संघ रविवारपासून बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला होता. यानंतर आता ही लय कायम ठेवण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघावर असेल.
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर प्रथमच खेळताना दिसणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत हार्दिकला मोठी कामगिरी करण्याची संधी आहे. हार्दिक पांड्याकडे बांगलादेशविरुद्ध सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा युझवेंद्र चहलचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
हार्दिकनं बांगलादेशविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. आगामी मालिकेत त्यानं चार विकेट्स घेतल्यास तो बांगलादेशविरुद्ध टी20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल. याशिवाय तो बांगलादेशविरुद्ध 10 बळी घेणारा पहिला गोलंदाज देखील ठरू शकतो. या यादीत दीपक चहरच्या नावाचाही समावेश आहे. त्यानं बांगलादेशविरुद्ध आठ विकेट्स घेतल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदरनं सात तर अश्विननं सहा विकेट्स घेतल्या आहेत.
हार्दिक पांड्यानं आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एकूण 86 विकेट घेतल्या आहेत. त्याच्याकडे भुवनेश्वर कुमारला मागे टाकण्याची सुवर्णसंधी आहे. भुवनेश्वर हा टी20 मध्ये भारतासाठी दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याला मागे टाकण्यासाठी हार्दिकला फक्त पाच विकेट्सची आवश्यकता आहे.
या लिस्टमध्ये युझवेंद्र चहल पहिल्या स्थानावर आहे. जर हार्दिकनं मालिकेत 11 विकेट्स घेण्यात यश मिळवलं, तर तो युझवेंद्र चहलला मागे टाकून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल.
भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वाधिक विकेट
युझवेंद्र चहल – 96
भुवनेश्वर कुमार – 90
जसप्रीत बुमराह – 89
हार्दिक पांड्या – 86
हेही वाचा –
भारतीय दिग्गजाच्या मुलाची पदार्पणातच शानदार खेळी, अवघ्या 26 षटकांत जिंकवला सामना
सामना ड्रॉ होऊनही मुंबईनं जिंकली इराणी ट्रॉफी! कसं काय जाणून घ्या
“धोनी नाही, हा आहे जगातील सर्वोत्तम फिनिशर”, कुमार संगकाराचं मोठं वक्तव्य