भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर एक विश्वविक्रम आहे, जो आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. मात्र आता भारताचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. फार काही नाही, हार्दिक फक्त एक सामना खेळून हा विक्रम मोडू शकतो.
वास्तविक, हा विक्रम मोडण्यासाठी हार्दिक पांड्याला पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणं आवश्यक आहे. जर तो या स्पर्धेत खेळला तर त्याला गांगुलीचा विश्वविक्रम मोडण्याची संधी आहे. विशेष म्हणजे, या विश्वविक्रमाच्या बाबतीत दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील हार्दिकच्या मागे आहेत.
भारतानं 2013 मध्ये शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 2017 च्या फायलनमध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्कारावा लागला होता. या स्पर्धेचा एक विक्रम सौरव गांगुलीच्या नावे आहे. खरं तर, गांगुली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. आता हार्दिक पांड्या हा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे.
सौरव गांगुलीनं 2004 मध्ये शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळली होती. तेव्हापासून आतापर्यंत 4 वेळा या आयसीसी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं, परंतु स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम अद्यापही कोणी मोडू शकलेला नाही. गांगुलीनं 13 चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांत 17 षटकार मारले आहेत. 2025 मध्ये हार्दिक पांड्या या स्पर्धेत सहभागी झाला तर तो गांगुलीचा विक्रम मोडू शकतो.
हार्दिकनं आतापर्यंत खेळलेल्या 5 चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांमध्ये 11 षटकार मारले आहेत. गांगुलीला मागे सोडण्यासाठी त्याला फक्त 7 षटकारांची गरज आहे. हार्दिक ज्या धडाकेबाज शैलीनं फलंदाजी करतो, ते पाहता तो केवळ एक सामना खेळूनही ही कामगिरी करू शकतो. रोहित शर्मा (8) आणि विराट कोहली (8) हे हार्दिकच्या मागे आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप 5 फलंदाज
सौरव गांगुली – 17
ख्रिस गेल – 15
इऑन मॉर्गन – 14
शेन वॉटसन – 12
पॉल कॉलिंगवुड – 11
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप 5 भारतीय
सौरव गांगुली – 17
हार्दिक पांड्या – 11
शिखर धवन – 8
रोहित शर्मा – 8
विराट कोहली – 8
हेही वाचा –
111 दिवस, 10 कसोटी…WTC फायनलपूर्वी टीम इंडियाची खडतर परीक्षा
आश्चर्यकारक! स्टंपला चेंडू लागला तरीही फलंदाज बाद नाही, पाहा VIDEO
काय सांगता! धोनीनं केली 15 कोटी रुपयांची फसवणूक? बीसीसीआयनं उत्तर मागितलं