टी20 विश्वचषक 2022मध्ये भारतीय संघाला इंग्लंडच्या हातून 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील दृष्टाकोनाबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी हार्दिक पांड्या याला स्थायी टी20 कर्णधार बनवावे असे मत नोंदवले होते. अशा सर्व चर्चांनंतर हार्दिकने देखील आपले मत उघडपणे मांडले आहे. न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या पांड्याने म्हटलय की या सर्व गोष्टी ऐकूण चांगले वाटते.
न्यूझीलंड विरुद्ध खेळलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0ने मालिका जिंकली. तिसरा सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला विचारण्यात आले की रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यासारखे दिग्गज खेळाडू तुला टी20 कर्णधार बनवण्याचा सल्ला देत आहेत. तर यावर पांड्या म्हणाला की, “जर कोणी असे बोलत असेल तर चांगले वाटते. मात्र, जोपर्यंत कोणत्याही प्रकारची अधिकारीक घोषणा होत नाही, तोपर्यंत काही सांगू शकत नाही. खरे सांगायचे झाले तर माझा दृष्टीकोन सरळ आहे. जर मला एका सामन्यात किंवा एका मालिकेत जरी कर्णधार केले तरी मी माझ्या पद्धतीने संघाचे नेतृत्व करेल. मला जसा खेळ समजतोय, त्याच प्रकारे मी संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल.”
पांड्या त्यानंतर म्हटला की,”जेव्हा कधी मला ही संधी मिळेल, तेेव्हा मैदानात जाऊन मी माझे सर्वोत्तम प्रदर्शन करेल आणि जर कर्णधारपदाविषयी बोलायचे झाले तर, या सर्व भविष्यकाळातील गोष्टी आहेे. त्यामुळे जेव्हा होईल तेव्हा बघता येईल.” त्यातच बीसीसीआयने पांड्याला स्थायी कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा सुरु आहे आणि लवकरच याची घोषणा देखील करण्यात येऊ शकते. एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपद रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे राहील.(Hardik Pandya commented on statement of Ravi Shastri and Sunil Gavskar on his permanent captaincy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीवर आली भांडी घासण्याची वेळ, फोटो होतोय भलताच व्हायरल
वेंकटेश अय्यरचा खुलासा; म्हणाला, ‘त्यामुळे रोहित शर्मा गोलंदाजीची संधी देत नाही’






