भारतीय संघातून सध्या बाहेर असलेला युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यर याने कर्णधार रोहित शर्माविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. वेंकटेश अय्यर भारतासाठी आतापर्यंत 9 टी-20 आणि 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळला आहे. पण यापैकी फक्त 4 टी-20 आणि एका एकदिवसीय सामन्याता त्याला गोलंदाजीची संधी मिळाली. याच पार्श्वभूमीवर त्याने स्वतः कारण सांगितले आहे, ज्यामुळे कर्णधार रोहित शर्माने त्याला गोलंदाजीसाठी जास्त संधी दिली नसावी.
वेंकटेशच्या मते कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) संघात इतर गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे त्याला गोलंदाजीला बोलवत नसेल. माध्यमांशी बोलत असताना वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर मलाही थोडे जाणवले की, गोलंदाजीच्या संधी कामी मिळत आहेत. पण कर्णधाराच्या रूपात जेव्हा मी या गोष्टींकडे पाहतो, तेव्हा समजू शकतो. कारण यापूर्वी मी माझ्या रज्याच्या संघाचे नेतृत्व केले आहे. कर्णधार म्हणून पाहिल्यानंतर असेच वाटते की, पाच गोलंदाज काम करत असताना गोलंदाजीच्या सहाव्या पर्यायाचा वापर करण्याची गरजच नाहीये.”
“ही एक चांगली गोष्ट आहे (सहा गोलंदाज), पण जेव्हा पाच गोलंदाच चांगली कामगिरी करत असतील, तेव्हा कर्णधाराला सहाव्या गोलंदाजी पर्यायाकडे लक्ष देण्याची गरज नसते. रोहित शर्माने अगदी हेच केले. वैयक्तिक दृष्ट्या पाहिले, तर मला 20 षटके फलंदाजी करायला आणि माझी चार षटके टाकायला आवडेल. पण प्रत्यक्षात या गोष्टी शक्य नाहीत,” असेही वेंकटेश पुढे बोलताना म्हणाला.
वेंकटेश अय्यर तसे पाहिले तर फलंदाजी अष्टपैलू म्हणून सर्वांना माहिती आहे. गोलंदाजीमध्ये त्याने अजून अपेक्षित प्रदर्शन केले नाहीये. आयपीएलमध्ये एकूण 8 सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी केली आहे, ज्यात तीन विकेट्स घेतल्या. तसेच आंतरराष्ट्रीय टी-20 मधील चार सामन्यांमध्ये गोलंदाजाच्या रूपात त्याने पाच विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील एका सामन्यात त्याने गोलंदाजी केली, पण यात एकही विकेट मिळाली नाही. (Disclosure of Venkatesh Iyer; Said, ‘That’s why Rohit Sharma is not giving a chance to bowl’)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जरा इकडे पाहा! भारताला विश्वविजेता बनवणाऱ्या खेळाडूची बीपीएलमध्ये एन्ट्री; म्हणाला, ‘जगातली भारी स्पर्धा’
हार्दिकची कॅप्टन्सी भारीच! म्हणाला,’ पूर्णवेळ नेतृत्व मिळाले तर मी माझ्या मना….’