‘बेगानी शादी में अब्दुल्लाह दीवाना’, ही म्हण टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या व्हिडिओमध्ये बसत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला क्रिकेटपासून बॉलिवूडपर्यंत सर्व स्टार्सनी हजेरी लावली होती. हार्दिक पांड्या लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये पूर्णपणे मग्न दिसला. हार्दिकने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत डान्स करताच त्याच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली.
Hardik Pandya showing his dancing shoes with Ananya Pandey. 😄pic.twitter.com/YTdrNcCCXS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 12, 2024
हार्दिक पंड्या अनंत अंबानीच्या लग्नात भाऊ कृणाल पंड्या आणि मेहुणी पंखुरी शर्मासोबत पोहोचला होता. मागील फंक्शनप्रमाणेच यावेळीही चाहते नताशाला शोधताना दिसले. व्हायरल व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या अभिनेत्री अनन्यासोबत डान्स करताना दिसत आहे. जे पाहिल्यानंतर चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. एका यूजरने लिहिले, ‘काय चालले आहे?’ तर एका चाहत्याने लिहिले की, ‘लोक नताशाला शोधत आहेत, आमचा हार्दिक भाई लवकरच काहीतरी करणार आहे.’ इतकेच नाही तर हा डान्स पाहून अनेक चाहत्यांना युवा क्रिकेटर रियान परागची आठवण झाली.
हार्दिक पांड्या आपल्या व्यक्तिक आयुष्याला घेऊन खूप चर्चेत आहे. मागील अनेक कार्यक्रमात पत्नी नताशा सोबत दिसला नाही.परंतु अद्याप या जोडीने कोणतेही आपपसांतील संबंधाबाबत खुला केले नाही. नताशा मागील काही दिवसात सोशल मीडियावर पोस्ट करत स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे हार्दिक पांड्या विश्वचषक जिंकल्याचा आनंद लूटताना पहायला मिळत आहे. हार्दिक पांड्या साठी मागील 1 वर्ष बऱ्याच चढ-उताराने गेला. 2023 च्या विश्वचषकात तो दुखापती झाला. त्यानंतर आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्याने चाहत्यांनी त्याला ट्रोल केले. पण यानंतर तो भारतीय संघसाठी टी20 विश्वचषकात मोलाचे योगदान दिले होते.
महत्तवाच्या बातम्या-
धोनी-गंभीरपासून ईशान किशनपर्यंत, या क्रिकेटपटूंनी अनंत-राधिकाच्या लग्नात लावली हजेरी
जेव्हा जेम्स अँडरसननं बॉक्सिंगमध्ये हात आजमावला! ॲशेस मालिकेपूर्वी झाला होता घोळ
अंबानींच्या लग्नात धोनीचा स्टाईलिश लूक, कुटुंबासोबतचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल