भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याचे दिवस सध्या फार वाईट चालले आहेत. आयपीएल 2024 मध्ये कर्णधार आणि खेळाडू म्हणून अपयशी ठरल्यानंतर आता तो आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
हार्दिक आणि नताशाचं 2020 मध्ये लग्न झालं होतं. त्याच वर्षी दोघांनी ‘अगस्त्य’ नावाच्या मुलाला जन्म दिला होता. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या विभक्त होण्याचा अंदाज यावरून लावला जात आहे की, नताशानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘पांड्या’ हे आडनाव काढून टाकलं आहे. याशिवाय तिनं हार्दिक पांड्यासोबतचे तिचे काही फोटोही इंस्टाग्रामवरून हटवले आहेत.
मुळची सर्बियची असलेली मॉडेल नताशा स्टॅनकोविक हिनं 31 मे 2020 रोजी हार्दिक पांड्यासोबत लग्न केलं होतं. या जोडप्यानं त्याच वर्षी 30 जुलै रोजी त्यांच्या पहिल्या मुलाला, अगस्त्याला जन्म दिला. मार्च 2024 मध्ये हार्दिकच्या आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे नताशा ऑनलाइन ट्रोलिंगची बळी ठरली होती. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या खराब सुरुवातीसाठी तिला जबाबदार धरून ट्रोलर्सनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर भरपूर अपमानास्पद टिप्पण्या केल्या होत्या.
4 मार्चला नताशाचा वाढदिवस होता. मात्र त्या दिवशी हार्दिकनं कोणतीही पोस्ट टाकली नाही. नताशानं तिच्या आणि हार्दिकच्या अलीकडील सर्व पोस्ट तिच्या इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या आहेत, ज्यामध्ये अगस्त्य तिच्यासोबत होता. याशिवाय, ती या आयपीएलमध्ये मैदानात एकदाही दिसली नाही किंवा तिनं टीमबद्दल सोशल मीडियावर पोस्टही केली नाही.
हार्दिकचा भाऊ क्रुणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुडी अजूनही नताशाच्या पोस्टवर कमेंट करत असले, तरी या दोघांमध्ये नक्कीच सर्वकाही ठीक नाही, असंच दिसतंय.
महत्त्वाच्या बातम्या –
दिनेश कार्तिक पाठोपाठ आता ‘गब्बर’ही करणार क्रिकेटला अलविदा? शिखर धवनच्या निवृत्तीबाबत काय आहे अपडेट?
केएल राहुलचं करिअर धोक्यात? भारतीय संघाची काळी बाजू केली उघड…बीसीसीआय ॲक्शन घेणार का?
“मला करा भारतीय संघाचा हेड कोच”, इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजानं केलं ट्वीट