---Advertisement---

हार्दिक पांड्याच्या संपत्तीचा 70 टक्के हिस्सा घेणार नताशा? मुंबईच्या कर्णधाराची एकूण संपत्ती किती?

On: शनिवार, मे 25, 2024 1:15 PM
Hardik Pandya And Natasha Stankovic
---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या फारच वाईट काळातून जात आहे. प्रथम त्याचा संघ खराब कामगिरीमुळे आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आणि आता त्याच्या पत्नीसोबत विभक्त होण्याच्या बातम्या येत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच घटस्फोट घेणार आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, नताशा पांड्याची 70 टक्के प्रॉपर्टी घेणार आहे. घटस्फोटाबाबत पांड्या किंवा नताशा यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

हार्दिक पांड्या आणि नताशा बरेच दिवस एकत्र दिसलेले नाहीत. दोघांनी 14 फेब्रुवारीला इंस्टाग्रामवर शेवटचा फोटो शेअर केला होता. यानंतर दोघे एका कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये एकत्र दिसले होते. पण आता त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. रिपोर्टनुसार, पांड्याला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के हिस्सा नताशाला द्यावा लागेल. यासंदर्भात अनेक पोस्ट सोशल मीडियावरती शेअर करण्यात आल्या आहेत.

हार्दिक पांड्या किती कमावतो?
हार्दिक पांड्या करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. आयपीएलसाठी मिळालेल्या मॅच फीसह तो इतर अनेक मार्गांनी कमाई करतो. पांड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याला मुंबईकडून फी म्हणून 15 कोटी रुपये मिळतात. यापूर्वी तो गुजरात टायटन्सचा भाग होता. गुजरातचा संघही पांड्याला तेवढीच रक्कम देत होता. यासोबतच तो बीसीसीआयचा करारबद्ध खेळाडू आहे, ज्याद्वारे त्याला भारताकडून खेळण्यासाठी मॅच फी मिळते.

हार्दिक पांड्याची कमाई करोडोंमध्ये आहे. यासोबतच ते ब्रँड एंडोर्समेंटमधूनही बक्कळ कमाई करतो. हार्दिकनं मुंबईमध्ये एक अपार्टमेंट घेतलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यानं हे घर 30 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. यासोबतच त्याचं वडोदरा येथे पेंटहाऊस आहे. त्याची किंमतही करोडोंमध्ये आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पराभवानंतर आता लाखो रुपयांचा दंड! राजस्थानच्या ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयनं केली कारवाई

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या नात्यात दुरावा? इंस्टाग्रामवरून आडनाव हटवल्यामुळे खळबळ!

हार्दिक-नताशा वेगळे होणार? ‘या’ 4 क्रिकेटपटूंचाही झाला आहे घटस्फोट, जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---