मुंबई। बुधवारी(3 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने 37 धावानी विजय मिळवत या मोसमातील दुसरा विजय मिळवला आहे.
मुंबईच्या या विजयात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मोलाचा वाटा उचलला त्याने फलंदाजी करताना 8 चेंडूत 25 धावा तर गोलंदाजी करताना एमएस धोनी, रविंद्र जडेजा आणि दिपक चहर या चेन्नईच्या तीन महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
त्याने फलंदाजी करताना 8 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकार मारला. या तीन षटकारांपैकी त्याने मुंबईच्या डावात शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर हॅलिकॉप्टर शॉट मारत लाँग ऑनला एक षटकार मारला. भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा ‘हॅलिकॉप्टर शॉट’ हा ट्रेडमार्क शॉट आहे.
त्यामुळे सामना संपल्यानंतर या शॉटबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला, ‘तो खूप विशेष होता. मी त्या शॉटवर काम केले आहे. मला तो शॉट खेळल्यानंतर खूप आभिमान वाटला. मला आपेक्षा होती की धोनी मला म्हणेल चांगला शॉट होता. पण असे काही झाले नाही.’
‘साधारणत: गोलंदाज माझ्याविरुद्ध स्टंपवर गोलंदाजी करतात. हा शॉट सोपा नाही. पण धोनीने तो बऱ्याचदा खेळला आहे. धोनी हा प्रेरणा आहे आणि आम्ही त्याच्यासारखे अनेक शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करतो. हा असा शॉट मी त्याला पाहून शिकलो आहे. मी आनंदी आहे तो शॉट खेळून.’
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पंड्या(25) आणि किरॉन पोलार्ड(17) यांनी केलेल्या शेवटच्या षटकातील तुफानी खेळीमुळे 5 बाद 170 धावा केल्या आणि चेन्नई समोर विजयासाठी 171 धावांचे आव्हान ठेवले. मुंबईकडून सुर्यकुमार यादवनेही 59 धावांची अर्धशतकी खेळी केली.
मात्र चेन्नईला 20 षटकात 8 बाद 133 धावाच करता आल्या. चेन्नईकडून केदार जाधवने 58 धावा करत चांगली झुंज दिली होती. पण त्याला अन्य फलंदाजांची योग्य साथ मिळाली नाही.
गोलंदाजीत मुंबईकडून लसिथ मलिंगा आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 3 तर जेसन बेऱ्हेंनडॉर्फने 2 विकेट्स घेतल्या. तसेच चेन्नईकडून दिपक चहर, इम्रान ताहिर, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Special to hit helicopter shot with @msdhoni watching: Hardik
"Hoped MS would congratulate me after that shot ????"
An overjoyed @hardikpandya7 talks about emulating inspiration MSD's pet stroke against CSK. Interview by @Moulinparikh #MIvCSK @mipaltan???? https://t.co/jLLWXuZRYe pic.twitter.com/aci6s6cPBF
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–जसप्रीत बुमराह विश्वचषकाआधी पुन्हा एकदा दुखापतग्रस्त, जाणून घ्या कारण
–१२ तासांत लसिथ मलिंगा खेळला दोन सामने, एक भारतात दुसरा श्रीलंकेत
–पोलार्डने आयपीएल २०१९ मधील घेतला आत्तापर्यंतचा सर्वात अफलातून कॅच, पहा व्हिडिओ






