आयपीएल 2024 च्या 5व्या सामन्याची सर्व क्रिकेटचाहते आतुरतेनं वाट पाहत होते. कारण या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससमोर त्याची जुनी टीम गुजरात टायटन्सचं आव्हान होतं. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला.
प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शुबमन गिल (22 चेंडूत 31 धावा) आणि साई सुदर्शन (39 चेंडूत 45 धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर गुजरातनं 6 गडी गमावून 168 धावा केल्या. मुंबईकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (14 धावांत 3 बळी) आणि गेराल्ड कोएत्झी यांनी (27 धावांत 2 बळी) धारदार गोलंदाजी केली.
प्रत्युत्तरात, धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनं चांगली सुरुवात केली. 15 व्या षटकापर्यंत सामना त्यांच्या हातात होता. मात्र शेवटच्या षटकात 19 धावांची गरज असताना त्यांचा सहा धावांनी पराभव झाला.
या सामन्यातील सर्वात मोठी बातमी म्हणजे हार्दिक पांड्याचं त्याच्या घरच्या मैदानावर पुनरागमन. कर्णधार म्हणून त्यानं गुजरातला 2022 मध्ये विजेतेपद आणि 2023 मध्ये अंतिम फेरीत नेलं होतं. मात्र 2024 हंगामासाठी तो मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला, जेथे तो 2015 ते 2021 दरम्यान खेळला होता.
मात्र हार्दिक पांड्याच्या पुनरागमनावर मुंबईचे चाहते खूष नाहीत. कारण हार्दिक केवळ खेळाडू म्हणून मुंबईत परतला नाही तर त्याला रोहित शर्माच्या जागी टीमचं कर्णधारही बनवण्यात आलंय. येथे नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. मात्र फ्रँचायझीच्या या निर्णयावरून दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये प्रामुख्याने सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे.
रविवारी, हा वाद स्टेडियमवर उफाळून आला. मुंबई आणि गुजरातच्या सामन्यादरम्यान दोन खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि ज्याचं रुपांतर हाणामारीत झालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही कोणत्याही खेळाडूचे समर्थक असले तरी ही घटना एकूणच भारतीय क्रिकेटच्या दृष्टीनं चांगली नाही. आता यावर अहमदाबाद पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
In yesterday’s match a Hardik Pandya fan was beaten by Rohit Sharma fans.
It was good that Hadik was not there, otherwise you also know what would have happened.😂🤣#HardikPandya #chapri #RohitSharma𓃵pic.twitter.com/TloOX5GTqM— CrickSachin (RR Ka Parivar) (@Sachin_Gandhi7) March 25, 2024
महत्त्वाच्या बातम्या-