राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबईच्या स्टेडियमवर झालेला आयपीएल २०२२चा २४ वा सामना गुजरात टायटन्सने ३७ धावांनी जिंकला. हा सामना सुरू होण्यापासून ते संपेपर्यंत गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या चर्चेत राहिला. प्रथम फलंदाजी करताना त्याने ५२ चेंडूत नाबाद ८७ धावा केल्या. त्यानंतर रॉकेट थ्रोवर त्याने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला धावबाद केले. तसेच गोलंदाजी करताना जिम्मी नीशमलाही बाद करत त्याने सामना दर्शकांचे पैसावसूल मनोरंजन केले. याशिवायही सामन्यादरम्यान एक असा क्षण आला, ज्यामुळे हार्दिकने चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या प्रेमात पाडले.
हा क्षण गुजरातच्या डावातील (GT vs RR) शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आला. जेव्हा राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णाचा (Prasidh Krishna) फुलटॉस चेंडू हार्दिकच्या (Hardik Pandya) बॅटच्या कडेला लागून गेला आणि यष्टीरक्षकाला हुलकावणी देत ४ धावांसाठी सीमारेषेच्या पार गेला. या मिस हिट चेंडूवर चौकार मारल्यानंतर हार्दिक हात हालवत प्रसिद्धची क्षमा (Hardik Pandya Feel Sorry) मागताना दिसला.
कारण हार्दिकला माहिती होते की, अशा चेंडूवर चौकार नाही मारायला पाहिजे. ज्यामुळे हार्दिकने प्रसिद्धची क्षमा मागितली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियाववर व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच भावला असून चाहते त्यावर व्यक्त होत आहेत.
https://twitter.com/SlipDiving/status/1514633069851918336?s=20&t=5o1qbE7WycoX5NCVHKqpZA
हार्दिकचा अष्टपैलू खेळ
हार्दिकच्या या सामन्यातील प्रदर्शनाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने फलंदाजी करताना नाबाद ८७ धावा फटकावल्या होत्या. ५२ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने त्याने ही शानदार खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे गुजरातचा संघ २० षटकअखेर ४ विकेट्सच्या नुकसानावर १९२ धावा करू शकला होता. त्यानंतर गोलंदाजी करतानाही त्याने एक विकेट घेतली होती. संपूर्ण डावात २.३ षटके टाकताना १८ धावा देत त्याने नीशमची एक विकेट काढली होती. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले.
हार्दिक कर्णधार म्हणूनही करतोय दमदार प्रदर्शन
अष्टपैलू प्रदर्शनाव्यतिरिक्त हार्दिक कर्णधार म्हणूनही दमदार खेळ दाखवत आहे. त्याने आतापर्यंत गुजरातला हंगामातील ५ पैकी ४ सामने जिंकून दिले आहेत. आतापर्यंत गुजरातला केवळ सनरायझर्स हैदराबादने पराभूत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“विराट-धोनीबद्दल सर्वजण चर्चा करतात, पण बुमराहनेही भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे”
मोठी बातमी! आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्ली कॅपिटल्सचा महत्वाचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह