“विराट-धोनीबद्दल सर्वजण चर्चा करतात, पण बुमराहनेही भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे”

"विराट-धोनीबद्दल सर्वजण चर्चा करतात, पण बुमराहनेही भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे"

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याच्या मते विराट कोहली आणि एमएस धोनीसारख्या खेळाडूंना नेहमीच महत्व मिळत आले आहे. परंतु, जसप्रीत बुमराहचे प्रदर्शन देखील वाखाणण्याजोगे आहे. कैफच्या मते जसप्रीत बुमराह असा खेळाडू आहे, जो संघासाठी सतत आणि दबावाच्या परिस्थितीत चांगले प्रदर्शन करत आला आहे. बुमराहमुळे भारतीय संघाला विदेशात यश मिळाले, असाही उल्लेख कैफने केला.

अशियामधील सर्वोत्तम क्रिकेटपटूंविषयी प्रश्न विचारला असता, कैफ म्हणाला की, “हे अवघड आहे, पण मला बुमराह आवडतो. लोक कोहलीपासून ते धोनीसारख्या फलंदाजांविषयी खूप बोलताना. ते सर्वजण महान खेळाडू आहेत. परंतु, बुमराह सारखा एखादा खेळाडू, जो खूप शांत स्वभावाचा आहे आणि दबावाच्या परिस्थितीत काम करतो, जे आपण मागच्या काही वर्षांपासून पाहिले आहे. तो सर्व प्रकारांमध्ये चालणाऱ्या खेळाडूच्या रूपात समोर येत आहे. त्याच्यामुळे भारताची विदेशात कसोटी जिंकण्याची टक्केवारी सुधारली आहे.” मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) विषयी स्पोर्स्ट्सकीडासोबत बोलताना व्यक्त झाला.

यावेळी कैफने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम त्याचा आशियातील दुसरा आवडता क्रिकेटपटू असल्याचे सांगितले. बाबर एक चांगला खेळाडू असून त्याच्या गुणवत्तेला दाद न मिळाल्याचे कैफला वाटते. “पाकिस्तानकडे खरी गुणवत्ता आहे आणि काही अप्रतिम खेळाडू आहेत. तो बाबर आजम आहे. मला शाहीन अफ्रिदीही आवडतो, पण मी बाबरला निवडेल. तो खूप चांगला खेळत आहे आणि सतत चांगली धावसंख्या करत आहे. असे असले तरी, त्याच्या प्रदर्शनासाठी त्याला पुरेशी दाद मिळाली नाही. पाकिस्तानसाठी तो पहिल्यापासून एक उत्कृष्ट खेळाडू राहिला आहे,” असे पुढे बोलताना कैफ म्हणाला.

दरम्यान, आयसीसीकडून दिला जाणारा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार नुकताच मार्च महिन्यातील प्रदर्शनसाठी बाबरला दिला गेला आहे. तर जसप्रीत बुमराह सध्या आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. चालू हंगामात मात्र मुंबईला अद्याप एकही विजय मिळालेला नाहीय.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

भर मैदानात इंच टेप घेऊन हार्दिक मोजू लागला रनअप, राजस्थानचे फलंदाज असहाय्य होऊन बसले बघत

Video: हार्दिक पंड्याचा बुलेट थ्रो अन् सॅमसन थेट तंबूत! स्टंपचेही तुकडे झाल्याने काही वेळासाठी सामनाही थांबला

बडे दिलवाला जोस! ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हार्दिक पुढे निघून गेल्यानंतर बटलरने असे काही करत जिंकली मने

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.